💥परभणी जिल्ह्यात स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत 14 ऑगस्ट पर्यंत शासकीय कार्यालयामार्फत विविध उपक्रमाचे आयोजन...!


💥जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी शासकीय कार्यालयांना दिल्या सामाजिक देशभक्तीपर उपक्रम राबवण्याचे आदेश💥

 परभणी (दि.10 आगस्ट) : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत दि. 5  ते 14 ऑगस्ट, 2022 या कालावधीमध्ये जिल्ह्यात ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत विविध उपक्रम/कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित 'हर घर तिरंगा' जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात पुढीलप्रमाणे उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सूचना दिल्या आहेत.

            यात गुरुवार दि. 11 ऑगस्ट, 2022 रोजी तालुकास्तरावर महिला बचतगटासाठी प्रदर्शन असून बचतगटातील महिलांसाठी मुख्य ठिकाणी विविध स्पर्धा व यात तिरंगा रंगामध्ये खाद्यपदार्थाचे प्रदर्शने, रांगोळी, मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. 12 ऑगस्ट रोजी परभणी येथील अक्षदा मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय गायन व सांस्कृतिक स्पर्धा, निवडक रांगोळीचे प्रदर्शन होणार असून तालुकास्तरावरील पहिल्या दोन विजेत्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेत देशभक्तीपर रांगोळी, गायन व सामुहिक नृत्य या विषयावर 3 मिनिटे प्रती व्यक्ती सादरीकरण होणार आहे. दि.13 ऑगस्ट रोजी सर्व शालेय विद्यार्थ्यांची एकाच वेळी ‘हर घर तिरंगा’ व देशभक्तीच्या घोषणा देत सकाळी 7 वाजता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 14 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावरील सर्व कार्यालयात, शालेय-महाविद्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी यांच्या सहभागातून स्वच्छता व प्लास्टीक कचरा संकलन करण्याची मोहीम राबविण्याचे उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सर्व कार्यालयांना दिल्या आहेत.....


                                                                                    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या