💥पुर्णेत 1 कोटी महावृक्षारोपण व संवर्धन अभियानास उस्फूर्त प्रतिसाद.....!


💥गुरूपुत्र श्री नितीन भाऊ यांच्या उपस्थितीत करण्यात आले वृक्षारोपण💥


पुर्णा (दि.२२ आगस्ट) - अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली देशात 1 कोटी वृक्षारोपण व संवर्धन अभियान सुरू झाले आहे. या माध्यमातून आदरणीय गुरूपुत्र श्री नितीन भाऊ यांच्या उपस्थितीत राज्यात जिल्हा व तालुका स्तरावर सामुहिक पद्धतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.


श्री गुरुपीठाच्यावतीने दरवर्षी सेवेकरी, पालक, विद्यार्थी व युवक यांच्या सहभागातून विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात."पर्यावरण" विषयावर जनजागृती करण्याच्या उद्देशाने एकत्रित आलेल्या पूर्णा भागातील सेवेकरी, प्रतिनिधी तसेच बालसंस्कार वर्गातील मुले, युवा वर्गाने वृक्षारोपण व संवर्धन करण्याचा संकल्प केला.


तहसील कार्यालय पूर्णा येथे झालेल्या वृक्षारोपण अभियानात तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम, तसेच नायब तहसीलदार श्री.नितेशकुमार बोलोलु साहेब व श्री मस्के साहेब यांची विशेष उपस्थिती होती. या अभियानाच्या निमित्ताने हजारो झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.


हा संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी राज्यातील नाशिक, पुणे,जळगाव,अहमदनगर,बिड, संभाजीनगर जिल्ह्यात हजारोंच्या संख्येत वृक्षारोपण पूर्ण झाले आहे या महावृक्षारोपन अभियानास राज्यासह देशात दिवसेंदिवस व्यापक स्वरूप येत असून दररोज हजारो झाडांचे वृक्षारोपण केले जात आहे. हे अभियान पर्यावरण रक्षणासाठी महत्वाचे ठरणार असल्याने जास्तीत जास्त वृक्षारोपण अभियानात सहभागी होण्याचे आवाहन सेवा कार्याच्या वतीने करण्यात येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या