💥पुर्णा नगर परिषद प्रशासनाकडून शहरात हौणारा माती/रेतीयुक्त अस्वच्छ पाणीपुरवठा देत आहे धोक्याचे संकेत...!


💥शहरात गॅस्टो मलेरीयासह अन्य साथींच्या आजारांच्या रुग्नात होत आहे सातत्याने वाढ : नगर परिषद प्रशासन निद्रिस्त💥


पुर्णा (दि.१८ जुलै) - पुर्णा नगर परिषद प्रशासनाचा कारभार अकार्यक्षम व बेजवाबदार मुख्याधिकारी नरळे यांच्यामुळे बेलगाम झाल्याचे निदर्शनास असून मुख्याधिकारी नरळे यांचे पाणीपुरवठा विभाग स्वच्छता विभाग बांधकाम विभागासह अन्य कुठल्याही विभागावर नियंत्रण नसल्यामुळे नसल्यामुळे नगर परिषद प्रशासनाचा कारभार संपूर्णपणे अनियंत्रित झाल्याचे निदर्शनास येत असून शहरातील नागरिकांना नगर परिषद पाणीपुरवठा विभागाकडून होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अक्षरशः माती/रेतीयुक्त अस्वच्छ होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या अस्वच्छ पाणीपुरवठ्यामुळे शहरात गॅस्टो मलेरीयासह अन्य साथींच्या आजारांच्या रुग्नात होत झपाट्याने वाढ होत असून शहरातील खाजगी रुग्नालयांत दिवसेंदिवस रुग्नांची संख्या वाढतांना दिसत असून शहरातील नागरिकांनी स्वच्छ व निर्जंतूक पाण्यासाठी आपला मोर्चा मिनरल वॉटरकडे वळवल्याचे दिसत असून शहरासह ग्रामीण भागात देखील अनेक मिनरल वॉटर प्लॉन्ट सुरू झाले असून सदरील मिनरल वॉटर प्लॉन्ट चालक मिनरल वॉटरच्या नावावर नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.  

मागील १० जुलै २०२२ पासून सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे शहरात जागोजाग तुंबलेल्या नाल्या रस्त्यांवर साचलेले नाल्यांतील गलिच्छ सांडपाणी यामुळे डासांची संख्या देखील झपाट्याने वाढत असून नगर परिषद प्रशासनाने मान्सुनपुर्व शहरातील छोट्या मोठ्या नाल्यांच्या स्वच्छतेकडे सपशेल दुर्लक्ष केल्यामुळे टायफाईड,मलेरीया,कावीळ,डेंग्यू सारखे आजार देखील फैलावण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यातच नगर परिषद प्रशासनाकडून अस्वच्छ व अक्षरशः माती/रेतीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यामुळे नगर परिषद प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे दिसत असून शहरात साथींचे आजारामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका झाल्यास यास सर्वस्वी नगर परिषद प्रशासनाचा अकार्यक्षम व बेजवाबदार कारभारच जिम्मेदार राहिल.

💥पुर्णा शहरातील गोरगरीब रुग्नांसाठी आवश्यकता प्राथमिक उपचार केंद्राची :-

पुर्णा-ताडकळस मार्गावरील शासकीय ग्रामीण रुग्नालय शहरापासून तब्बल दोन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे शहरातील अजिज नगर,मस्तानपुरा,अण्णाभाऊ साठे नगर,कोळीवाडा,धनगर वाडा,भिमनगर,कुंभार गल्ली,कुरेशी मोहल्ला,डोबी गल्ली,अली नगर,पंचशिल नगर,हरिनगर परिसरातील गोरगरीब रुग्नांना शासकीय ग्रामीण रुग्नालयात जाण्यासाठी प्रतिव्यक्ती साठ ते सत्तर रुपये खर्च करावा लागतो त्यामुळे असंख्य गोरगरीब रुग्नांना आजारापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडीकल वरून गोळ्या औषधी घेऊन तात्पुरता उपचार घेऊन समाधान मानावे लागते त्यामुळे आजार बळावल्यानंतर अश्या रुग्नांना नाईलाजास्तव खाजगी सावकारांकडून मनमानी व्याजदराने पैसे घेऊन एकतर खाजगी रुग्नालयांत उपचारासाठी दाखल व्हावे लागते किंवा अक्षरशः मृत्यूचा सामना करावा लागतो त्यातल्या त्यात सर्वसामान्य रुग्नांना देखील एखाद्या दुभत्या म्हशीप्रमाणे समजणाऱ्या खाजगी डॉक्टरांकडून परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता मोठ्या प्रमाणात आर्थिक सोशन केले जात असल्याचे निदर्शनास येत असून शेवटी विलाज न झाल्यास नांदेड किंवा परभणीचा रस्ता दाखवल्या जात असल्यामुळे दरवर्षी अनेक गोरगरीब रुग्नांना आपले प्राण गमवावे लागत असल्यामुळे शहरातील सर्वसामान्य गोरगरीब रुग्नांसाठी एका शासकीय प्राथमिक उपचार केंद्राची आवश्यकता निर्माण झाली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या