💥शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांचा नांदेड हिंगोली जिल्हा दौरा....!


💥नांदेड व हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर दि.31 जुलै 2022 रोजी येत येणार💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली व नांदेड जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख नियुक्त झालेले संपर्कप्रमुख श्री.बबनराव थोरात हे नांदेड व हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर दि.31 जुलै 2022 रोजी येत आहेत.

      रविवार दिनांक ३१ जुलै रोजी नांदेड  विश्रामगृहावर  सकाळी ११ वाजता आजी-माजी लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार आहे. दरम्यान, दुपारी १२ वाजता पदाधिकाऱ्यांची तर १ वाजता विधानसभा मतदार संघनिहाय बैठक आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ५ वाजता शहरातील जेष्ठ विचारवंत व शिवसैनिकांच्या भेटी घेणार आहेत. सोमवार दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता वारंगा फाटा, १० वाजता आखाडा बाळापूर, १०.३० वाजता कळमनुरी ११.३० वाजता 

हिंगोली शहराकडे प्रयाण करुन दुपारी १२ वाजता हिंगोली विश्रामगृह येथे आजी-माजी लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तर सायंकाळी ५ वाजता शहरातील जेष्ठ विचारवंत व शिवसैनिकांच्या भेटी घेऊन शिवसेना वाढीसाठी चर्चा केली जाणार आहे.

संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या समवेत माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी मंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर,श्रीमती अनुसया खेडकर,रोहिदास चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी दोन्ही जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिवसैनिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या