💥हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस,अवघ्या पंचविस ते तिस मिनिटात जिकडे तिकडे पाणीच पाण...!


💥अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके पाण्याखाली💥


* शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

हिंगोली : याही वर्षी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यावर वरून राजाने अवकृपा दाखवली आहे. पेरणी झाल्याच्या सुरुवातीपासून म्हणजे एक महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे.सुरू असलेल्या पावसामुळे कोवळ्या पिकांना फटका परिणामी याचा उत्पादन वाढीवर परिणाम होणार आहे.आज दुपारी सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील दिग्रस कराळे, चांगेफळ या सह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला अवघ्या 25 ते 30 मिनिटात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र बघायला मिळाले. तर काही ठिकाणी पिके सुद्धा पाण्याखाली झाकल्याचे दिसून आले.पाऊस केव्हा उघडतो याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.संततधार पावसामुळे पिकांची  वाढ  देखिल खुंटली आणि तूरीचे पिक तर पूर्ण पणे जळून गेले आहेत आणि आत्ता सोयाबीन कापूस हळद पिके पाण्याखाली आहेत त्यामुळे शेतकरी आत्ता हवालदिल झाला आहे तरी प्रशासनाच्या वतीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याना आर्थिक नुकसान भरपाई करावी अशी मागणी ग्रामस्थाकडून केली जात आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या