💥पुर्णा येथील स्वा.सै.सूर्यभानजी पवार महाविद्यालयात कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा...!


💥प्रभारी प्राचार्य डॉ.संतोष कुऱ्हे यांनी मा.मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले💥

पूर्णा - येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी   पवार महाविद्यालयात महाराष्ट्राचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव फुलसिंग नाईक यांची जयंती व कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संतोष कुऱ्हे यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी यांनीही माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ. प्रभाकर किर्तनकार यांनी केले तर आभार महाविद्यालयातील शारीरिक संचालक प्रा.डॉ.भारत चापके यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या