💥साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्याचे आवाहन....!


💥परभणी शहर व जिल्हातील मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांना आवाहन💥

परभणी (दि.12 जुलै) : परभणी शहर व जिल्हातील मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकिय व अभियंत्रिकी उत्तीर्ण झाल्याला विद्यार्थ्यां करीता महामंडळकडुन सरासरी 60% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती करीता अर्ज करावेत. जेष्टता व गुणानुक्रमांमध्ये नुसार 03  ते 05 विद्यार्थीची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरीत करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमांमध्ये विशेष प्रविण्याने गुणवता मिळवुन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, टि सी, मार्क मेमो, दोन फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतलेल्या पुराव्यासह दोन प्रतित आपल्या पुर्ण पत्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकसह साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) परभणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामजिक न्यायभवन जायकवाडी वसाहत कारेगांव रोड परभणी या पत्तावर दि. 21 जुलै 2022 पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सि. के. साटे यांनी प्रसिध्दी पञकाद्वारे केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या