💥परभणी जिल्ह्यातील रेल्वे संदर्भातील विविध समस्या तात्काळ मार्गी लावण्याची मागणी...!


💥भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने घेतली नांदेड येथील विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांची भेट💥


नांदेड/पुर्णा (दि.३० जुलै) - परभणी जिल्ह्यातील रेल्वे संदर्भातील विविध समस्यांकडे दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयात कार्यरत विभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन रेल्वे संदर्भातील विविध प्रश्न मार्गी लावावे याकरिता विभागीय रेल्वे प्रबंधक यांच्यासह संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांची भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली यावेळी शिष्टमंडळात भाजपा परभणी जिल्हा अध्यक्ष डॉ.सुभाष कदम, जिल्हा सरचिटणीस प्रमोद वाकुडकर,जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत भिमरावजी कदम,जिल्हा उपाध्यक्ष बालाजी रुद्रवार,उद्योगाचे जिल्हा संयोजक प्रतीम चकरावर,गंगाखेड तालुका चिटणीस अंगद भिसे, गंगाखेड मंडळाचे अनुसूचित जातिमोर्चा  अध्यक्ष रमेश शेल्हके,मुळी केंद्रप्रमुख विश्वनाथराव भिसे आदींचा समावेश होता यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नागठाणा - मुळी रेल्वे गेट क्रमांक १४ वरील कामामुळे मुळे  व नागठाणा गावच्या गावकऱ्यांना होणाऱ्या अडचणी तातकाळ सोडवाव्यात,चुडावा-पूर्णा दरम्यान गोविंदपुर आदी ८ गावातील शेतकऱ्यांना रेल्वे लाईन पार करण्यासाठी तत्काळ मार्ग काढावा,तिरुपती गाडीला सेलू येथे थांबा मिळावा,गुजरात राज्यातील सुरतला जाण्यासाठी पूर्णा रेल्वे जंक्शन येथून दररोज गाडी सुरू करावी आदी मागण्या करण्यात आल्या असून भाजपच्या वतीने या मागण्यां संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनावर यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी त्वरीत मार्ग काढण्याचे अभिवचन दिले....

    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या