💥गंगाखेडच्या कापड मार्केट मधील खड्डे बुजवण्याच्या कामास अखेर प्रारंभ....!


💥आम आदमी पार्टीच्या पाठपुराव्याला यश💥

गंगाखेड /प्रतिनिधी 

शहरातील वकील कॉलनी भागातील कापड मार्केटमध्ये रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यास रविवारी प्रारंभ झाला. आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आल्याने व्यापाऱ्यात समाधान व्यक्त केले जात आहे .


मागील तीन दिवसांपूर्वी कापड लाईन येथील व्यापारी रोहिदास निरस यांनी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना कापड लाईनला बोलावून घेत मार्केट मधील रस्त्यावरील खड्डे दाखवले .या खड्ड्यात साचणाऱ्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या महिला  लहान बालके, कोचिंग क्लासेस साठी येणारे विद्यार्थी या सर्वांना त्रास होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.सर्व व्यापाऱ्यांनी मिळून हे खड्डे बुजवण्यासाठी नगरपालिकेकडे प्रयत्न करावेत अशी विनंती सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याकडे केली होती.यावरून बोबडे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी फड मॅडम यांच्याशी संपर्क साधून हे खड्डे बुजवावे अशी विनंती केली होती.रविवारी नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन खड्डे बुजवण्यासाठी लागणारे खडी ,कच साहित्य आणून टाकले.कामास सुरुवातही झाली. अनेक वर्षापासून या भागातील खड्डे बुजविण्या याकडे कोणीही लक्ष देत नव्हते.पण आज या खड्ड्याचा प्रश्न मिटल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.यासाठी पुढाकार घेणारे सखाराम बोबडे पडेगावकर वागलगावचे माजी सरपंच नारायणराव घनवटे, मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव  मिसे, राहुल साबणे यांचे आभारही मानले. एकूणच खड्डे बुजवल्यामुळे परिसरातील व्यापारी व पादाचार्यांनी समाधान व्यक्त केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या