💥परभणी तालुक्यातील पिंपळगाव येथील लाचखोर तलाठी दिड हजार रुपयांची लाच स्विकारतांना एसीबीच्या जाळ्यात...!


💥लाचखोर तलाठी सुभाष राऊत याने तक्रारदारास शेत-जमीनीचे फेरफार करण्यासाठी मागीतली होती लाच💥

परभणी (दि.२७ जुलै) - तालुक्यातील पिंपळगाव तलाठी सज्जाचे लाचखोर तलाठी सुभाष राऊत यांनी तक्रारदार पुरूष वय ३० वर्षे यांना स्वतः खरेदी केलेल्या शेत-जमीनीचे फेरफार करून देण्यासाठी दि.२६ जुलै २०२२ रोजी २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती तडजोडी नंतर १५००/-रुपये देण्याचे ठरले दरम्यान तक्रारदाराने या संदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली त्यांनी दिलेल्या तक्रारीची शहानिशा करून लाच लुचपत विभागाने यशस्वी सापळा कार्यवाही करीत लाचखोर तलाठी (लोकसेवक) सुभाष राऊत सज्जा पिंपळगाव ता.परभणी राहणार राजपार्क,राज गॅलक्शी जी २१०,मालेगाव रोड,नांदेड यास दिड हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहात ताब्यात घेतले.

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की यातील लोकसेवक तलाठी सुभाष राऊत याने सदर तक्रारदाराने स्वतः खरेदी केलेल्या शेत जमीनीचे  फेरफार करून त्याची नोंद सात बारा वर घेण्यासाठी  २ हजार रुपयांच्या लाचेची पंचा समक्ष मागणी करून तडजोडीअंती  १५००/- रु लाचेची मागणी  केली. सदर लाचेची रक्कम १५००/- रुपये  स्वतः त्याच्या खाजगी कार्यालयात आज बुधवार दि.२७ जुलै २०२२ रोजी पंचा समक्ष स्विकारली आहे. 

      आरोपी लोकसेवक तलाठी सुभाष राऊत यास लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले आहे. आलोसे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते दरम्यान सदरील सापळा कारवाई लाचलु लुचपत प्रतिबंधक विभाग परिक्षेत्र नांदेडचे पोलिस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे व अप्पर पोलिस अधिक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत विभाग परभणीचे पर्यवेक्षण अधिकारी तथा उप अधिक्षक किरण बिडवे,सापळा अधिकारी तथा पोलिस उप अधिक्षक सदानंद वाघमारे,पोलिस निरिक्षक बसवेश्वर जकीकोरे सापळा कारवाई पथकातील सहकारी पोलीस हवालदार निलपत्रेवार,पोलीस हवालदार कटारे,पोलीस शिपाई कदम व चालक पोना कदम,ला.प्र.वि.युनिट परभणी यांनी यशस्वीपणे पार पाडली....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या