💥परळी नगर परिषद निवडणूक कामाला लागा ; विजय वंचितचाच - जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे


💥परळी येथे आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपले विचार व्यक्त केले💥

   परळी (दि.28 जुलै) - राज्यात होऊ घातलेल्या नगर परिषद,जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वबळावर उमेदवार उभे करून राज्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद दाखवून द्या व सत्ता संपादनाची तयारी करा अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे यांनी परळी येथे आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपले विचार व्यक्त केले.

     परळी येथील चेंबरी रेस्ट हाऊस येथे दि 24 जुलै रोजी वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन युवक आघाडीच्या बीड जिल्हा पदाधिकारी, तालुका व शहर पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत होऊ घातलेल्या परळी नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली तसेच बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर सर्वच जागा लढवणार असल्याचा ठराव घेण्यात आला.

       या बैठकीत परळी नगर परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रमुख आठ कार्यकर्त्यांची सुकाणू  समिती स्थापन करण्यात येऊन या समितीच्या देखरेखीखालीच परळी नगरपरिषदेची निवडणूक पार पाडली जाईल असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला व तसे अधिकार या सुकाणू समितीस देण्यात आले.

   या सुकाणू समितीमध्ये वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, बीड जिल्हा सहसचिव ॲड.संजय रोडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्नजीत रोडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष गौतम साळवे, तालुकाध्यक्ष संजय गवळी, शहराध्यक्ष गफार शहा, युवक तालुका अध्यक्ष राजेश सरवदे, युवक शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांची निवड करण्यात आली.

     वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीचे प्रास्ताविक बीड जिल्हा सहसचिव ॲड.संजय रोडे यांनी केले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे हे होते.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्नजीत रोडे यांनीही आपले विचार मांडले.

    वंचित बहुजन आघाडीच्या या विशाल बैठकीस जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे यांचे सह जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, जिल्हा सहसचिव ॲड. संजय रोडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्नजीत रोडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष गौतम साळवे,युवक जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव रोडे,परळी तालुकाध्यक्ष संजय गवळी,परळी शहराध्यक्ष गफार शाह,युवक तालुकाध्यक्ष राजेश सरवदे,युवक शहराध्यक्ष प्रेम जगतकर,शुद्धोधन आचार्य, भीमराव कसबे, दत्तात्रेय श्रीहरी आघाव, ज्ञानेश्वर गीत्ते,धम्मा क्षीरसागर, संतोष मस्के, बाळासाहेब किरवले, राजू भूतके, धम्मपाल भूतके, अविनाश गायकवाड, अवि मुंडे, विनोद रोडे, अजय कांबळे, धम्मानंद कासारे, अभिमन्यू घोबाळे, राहुल बचाटे, आदेश जंगले, संदीप ताटे आदिंसह शेकडोच्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या