💥आपल्या शाळेतून एक चांगला विद्यार्थी घडावा हाच एक प्रामाणिक उद्देश या शाळेचा नेहमीच राहिला आहे💥
✍️ मोहन चौकेकर
चिखली: अवघ्या काही कालावधीत नावारूपाला आलेल्या दि. चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेचा इयत्ता १० वीचा निकाल मागील वर्षाप्रमाणे १०० टक्के लागला. याही वर्षी या शाळेने मागील तीन वर्षाची १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यामागे शाळेचे अध्यक्ष मा. सतीशजी गुप्त, शाळेच्या शैक्षणिक संचालिका मा. सौ. डॉ. पूजा गुप्ता, प्राचार्य गौरव शेटे तसेच शाळेचे सर्व शिक्षक वृंद यांचे श्रम स्पष्टपणे दिसतात. आपल्या शाळेतून एक चांगला विद्यार्थी घडावा हाच एक प्रामाणिक उद्देश या शाळेचा नेहमीच राहिला आहे.
दि. चिखली अर्बन विद्यानिकेतन हि बुलडाणा जिल्ह्यातून अशी एकमेव शाळा आहे कि, ज्या ठिकाणी विद्यार्थ्याची चांगल्या प्रकारे जडणघडण होते. व त्याच्यामध्ये चांगल्या सिद्धांताची, मूल्याची रुजवणूक होते. आणि हेच मुल्य, सिद्धांत घेऊन या शाळेचा विद्यार्थी जगाच्या पाठीवर कोठेही असो तो कधीच मागे येऊ शकत नाही, तो कोणत्याही स्पर्धेत टिकून राहू शकतो.
या शाळेतील एकूण २७ विद्यार्थ्यापैकी ८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले, तसेच १७ विद्यार्थ्यांनी ८० टक्के गुण तर ६० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी २६ आहेत.
प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये अजय संदीप पानगोळे व समृद्धी नामदार गायकवाड हे विद्यार्थी आहेत. तर सारंग रमेश नागरे, नयन रवींद्र खंडेलवाल, रुपाली लक्ष्मण शेवाळे, वैष्णवी सदानंद देशमुख, अथर्व अजय देशमुख, रेणुका संजय लोलगे ह्या विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत.
अशा प्रकारे दि. चिखली अर्बन विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल लागल्यामुळे दि चिखली अर्बन विद्यानिकेतनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या