💥शिवसेना नेते खा.संजय राऊत यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी....!


💥किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीवरून शिवडी न्यायालयाने अटक वॉरंट जारी💥

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीवरून शिवडी न्यायालयाने अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना मेधा सोमय्या यांचाही उल्लेख केला होता. त्यांच्या याच आरोपांप्रकरणी सोमय्या न्यायालयात केले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी राऊत यांना याप्रकरणी मोठा झटका बसणार असल्याचा इशारा दिला होता. अखेर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

💥न्यायालयात हजर न राहिल्याने वॉरंट :-

शिवसेना नेते संजय राऊत यांना खूप मोठा झटका देणारा निर्णय शिवडी न्यायालयाने दिला आहे. संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी न्यायालयाने जामीनपत्र अटक वॉरंट जारी केले आहे. संजय राऊत यांनी वारंवार आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले, अशी तक्रार मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात केली होती. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र संजय राऊत हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. मीरा भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. त्यापैकी 16 शौचालये बांधण्याचे८ कंत्राट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाल्याचा दावा राऊत यांनी केला होता. मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे खोटे कागदपत्रे दाखल करुन फसवणूक करण्यात आली. त्यातून साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिले घेतल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या