💥पुर्णा तालुक्यातील राज्य मार्ग खुजडा ते मिरखेल पासून फुकटगाव.कान्हेगाव.ममदापूर.गणपूर रस्ता झाला चिखलमय...!


💥या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी याकरिता संभाजी सेनेने दिले तहसिलदारांना निवेदन💥


पूर्णा (दि.२१ जुलै) - तालुक्यातील राज्यमार्गांसह ग्रामीण भागातील गावरस्यांची देखील अत्यंत दयनिय अवस्था झाली असून पावसामुळे रस्ते अक्षरशः चिखलमय झाले असून ग्रामीण भागातील अबाल वृध्द शाळकरी विद्यार्थ्यांना अक्षरशः चिखलातून मार्गक्रमण करावे लागत असल्याचे भयावह चित्र पाहावयास मिळत असून तालुक्यातील  खुजडा रोड ते फुकटगाव,कान्हेगाव.ममदापूर.गणपूर रोड हा अक्षरशः चिखलमय झाला असून या रस्त्याने वाहन धारकांना तर सोडाच पादचारी माणसांना देखील चालने कठीण झाल आहे.


या महत्वाच्या मार्गावरील मिरखेल रेल्वे स्टेशनला असलेल्या सौ.रुख्मिणबाई अंभोरे विद्यालय व.उच्च मध्यमिक विद्यालय मिरखेल या विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना सुद्धा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या विद्यार्थीनींना शाळेत जाण्या येण्यासाठी स्कुलबसची सुविधा आहे परंतु स्कूल बस या मार्गावर कशी बशी मिरखेल पासून ममदापूर पर्यंत येते पण तेथून पुढे येत नाही त्या मुळे कान्हेगाव ते ममदापूर २ किलोमीटरचे अंतर असलेल्या कान्हेगावातील मुलींना पायी प्रवास करावा लागत आहे.

त्यामुळे सकाळी शाळेला जाताना कान्हेगावातील मुलींना २ किलोमीटर अक्षरशः चिखल तुडवत पायी प्रवास आणी शाळेतून घरी येते वेळेस २ किलोमीटर परतीचा प्रवास असा चार किलोमीटरचा प्रवास करीत शिक्षण घ्यावे लागत आहे या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यामुळे गावकरी मंडळींसह पालकवर्गात देखील संताप व्यक्त होत आहे.

या रस्त्याच्या झालेल्या दयनिय अवस्थेकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे संभाजी सेना तालुकाध्यक्ष गोविंद मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिस्टमंडळाने निवेदन दिले असून या निवेदनावर तालुका उपाध्यक्ष अंगद बोबडे,तालुका संपर्क प्रमुख सोपान काळबांडे यांच्या स्वाक्षरी आहेत...... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या