💥आरोग्य विभागाच्या टीमकडून वस्तीवर जाऊन पाहनी💥
गंगाखेड प्रतिनिधी
पाच ते दहा-बारा वर्षातील बालकांना अंग खाजण्याचा त्रास होत असल्याची माहिती मिळताच गंगाखेड येथील आरोग्य विभागाच्या टीमने पारध वस्तीवर घटनास्थळी जाऊन बालकांची तपासणी करत शुक्रवारी उपचार केले.
मरडसगाव पासून पालम कडे जाणाऱ्या रस्त्यावर पारधी समाजाची वस्ती आहे. या वस्तीवरील पाच ते दहा वर्षाखालील बालकांना अचानक अंग खाजण्याचा त्रास झाला. ही माहिती या वस्तीवरील राहणारे महादू सुरवसे यांनी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना कळवत आरोग्य विभागाला पाठवून द्यावे अशी विनंती केली .यावरून सखाराम बोबडे पडेगावकर ,नारायण घनवटे, जयदेव मिसे आदींनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ बिराजदार यांच्याशी संपर्क साधून ही माहिती कळवली. यावरून डॉ बिराजदार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र महातपुरी, प्राथमिक आरोग्य केंद्र विठ्ठलवाडी आधी ठिकाणच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून त्या बालकांची तपासणी करत औषध गोळ्या दिल्या. वस्तीवरील ग्रामस्थांनी आरोग्य विभागाचे आभार मानले....
0 टिप्पण्या