💥जिंतूर पो स्टे येथे मुस्लिम बांधवांची बकरी ईद व आषाढ एकादशी सणा निमित्त शांतता कमिटी बैठक संपन्न....!


💥शांतता समितीच्या बैठकीला अधिकारी/कर्मचारी यांच्यासह प्रतिष्ठित मोठ्या संख्येने उपस्थित होते💥

 जिंतूर  प्रतिनिधि. / बी.डी. रामपूरकर

आज दिनांक 8/7/2022 रोजी  जिंतूर पो स्टे येथे मुस्लिम बांधवांची बकरी ईद व हींदुचा पवित्र आषाढी एकादशी   या सणाचे अनुषंगाने मज्जिदचे मौलाना व  खाटीक, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित,  व पत्रकार बांधव, व वैद्यकीय पशुअधिकारी, व सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी ,जमादार याच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. सदर बकरी ईद अनुषंगाने  पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार येणाऱ्या दिनांक 10/7 रोजी जिंतूर मधील दोन्ही ईदगामध्ये सुलेमानी व शमशोदीन, ग्रामीण भागात आडगाव भोगाव, इटोळी, येलदारी, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल मुस्लीम बांधव जमलेल्या समुदायाने योग्य सामाजवतीच्या रित्या पार पाडाव्या येणाऱ्या कुर्बानी संबंधी  दक्षता व कशी राहिलं याबद्दल कुर्बानी नंतर टाकाऊ मास व हाडाचे तुकडे यांची इतर कोणास बाधा नको व आपल्या सामाज परीने व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावावी तसेच मासाची ने- आण करते वेळेस ते व्यवस्थितरित्या झाकून न्यावेत व उघड्यावर मास विक्रीकरूनयेत

आणि जनावरची कुर्बानी देणाऱ्या जनावराची दाखला सोबत ठेवावा डॉक्टर कडून घेतलेलं प्रमाणपत्र सुद्धा योग्य असावा घेतल्या नंतरच कुर्बनी करावी या व इतर विषयावर चर्चा करून योग्य ते मार्गदर्शन केले. सर्वसामाजातील प्रतिष्ठित एक सलोखा एकजूट सहकार्य करून हा सण पार पाडण्यात येईल असेही सर्व समाजाच्या वतीने  आश्वासन देण्यात आले आहे

विशेष म्हणजे या शांतता समितीच्या बैठकीला न.प.प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, महावितरण ,आदी कुठल्याही ऑफिसचे जबाबदार अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे उपस्थितां मध्ये नाराजी दिसून आली तर यानंतरच्या शांतता बैठकी सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यासाठी कळविण्यात येईल असे शांतता समितीचे अध्यक्ष व जिंतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दंतुलवार यांनी सांगितले....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या