💥याप्रसंगी प्रमुख उपस्थिती भंते पयावंश,भंते संघरत्न म्हणते तेज बोधी,भंते पयत्तीस व श्रामनेर संघाची असणार आहे💥
पूर्णा (दि.१२ जुलै) : बोधिसत्व डॉक्टर बि.आर.आंबेडकर स्मारक समिती व बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा यांच्यावतीने बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी भदंत डॉक्टर उपयुक्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वर्षावास व आषाढ पौर्णिमेनिमित्त धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती भंते पयावंश, भंते संघरत्न म्हणते तेज बोधी, भंते पयत्तीस व श्रामनेर संघाची असणार आहे प्रमुख अतिथी म्हणून जालना येथील सामाजिक कार्यकर्ते सुधाकर निकाळजे नांदेड महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक बापूराव गजभारे पूर्णा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड परभणी येथील सामाजिक धार्मिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये योगदान असलेले डॉक्टर परमेश्वर साळवी, डॉक्टर संघमित्रा साळवी डॉक्टर बी.टी दुथमल असणार आहेत.
सकाळी साडेपाच वाजता परित्राण पाठ व सूत्र पठण करण्यात येईल. दुपारी 12.30 वाजता पूजा विधी सत्कार समारंभ व पूजनीय भिखु संघाची धम्मदेशना होणार आहे.धम्म देशनेनंतर रुक्मीनबाई गंगाराम कांबळे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त सुरेश गंगाराम कांबळे व परिवारातर्फे खीररदान करण्यात येईल.
वरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर बी आर आंबेडकर व बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा व धम्म सेवेमध्ये कार्यरत असलेल्या महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे....
0 टिप्पण्या