💥परभणी येथील समाज कल्याण विभागाकडून जमीन खरेदीला स्थगिती....!


💥असे समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुट्टे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे💥

 परभणी, (दि.08 जुलै) : परभणी येथील समाज कल्याण कार्यालयातर्फे दि.1 जुलै 2022 रोजी दै.लोकमत वर्तमानपत्रामध्ये मराठवाडा पृष्टावर जाहीर प्रगटन देण्यात आले होते. त्यामध्ये नमुद असलेल्या अनुक्रमांक 26 वरील आकाश देविदास राठोड रा.चारठाणा ता. जिंतूर जि.परभणी यांच्या गट क्र.305 मधील एकुण 1 हेक्टर 60 आर जमीन खरेदी प्रक्रियेला तांत्रिक कारणामुळे तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे. असे समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुट्टे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.


-*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या