💥पुर्णा तालुक्यातीळस ताडकळसच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्ह्यात वर्चस्व.....!


💥जिल्ह्यातील ८० पैकी तब्बल ३ विद्यार्थ्यांनी मारली बाजी💥

 पुर्णा तालुक्यात ग्रामीण भागातील ताडकळस येथे गत काही वर्षांपासून शिक्षणाविषयी दृष्टीकोन बदलला असताना गत ५ ते ६ वर्षांपासून येथील प्रेरणा कोंचीग क्लासेसच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचवली आहे. यावर्षी परभणी जिल्ह्यातुन तब्बल २० ते २२ हजार विद्यार्थ्यांनी नवोदय परिक्षा दिली होती. यापैकी केवळ संपूर्ण जिल्ह्यातुन ८० विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरले आहेत.

 यापैकी ताडकळसच्या तब्बल ३ विद्यार्थ्यांनी या परिक्षेत घवघवीत यश संपादन करून बाजी मारली आहे. या परिक्षेत येथील प्रेरणा कोचिंग क्लासेसचे आदित्य नरेंद्र खंदारे व युवराज द्रोपद फुलवरे व गणराज गंगाप्रसाद गुंजकर या विद्यार्थ्यांनी नवोदय परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. श्रेया इंटलैजंट अकँडमी परिक्षेत देखील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच १० वीच्या परिक्षेत देखील १०० पैकी १०० गुण अनेक विद्यार्थ्यांनी घेतले आहेत. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे ताडकळस सारख्या ग्रामीण भागात देखील कोणत्याही सुविधा नसतांना नवोदय सारख्या परिक्षेत देखील वर्चस्व निर्माण केल्याने भविष्यात नक्कीच सर्व शिक्षकांच्या परिश्रमाने शिक्षण क्षेत्रात ताडकळसचा नविन पॅटर्न होईल या अपेक्षेसह पुन:च यशस्वी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालकांचे मनापासून हार्दिक अभिनंदन व भविष्यातील यशाबद्दल हार्दिक शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या