💥वंचित बहुजन आघाडीच्या ओबीसी आंदोलनाला यश : पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा करणार - प्रेम जगतकर


💥रस्त्यावरची लढाई लढणारे एकमेव नेते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर हेच आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही💥

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष स्वाभिमानी नेते बहुजन ह्रदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी मुंबई येथे विधान भवनावर ओबीसी बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी महामोर्चा काढून त्या वेळेस च्या सरकारला ओबीसी आरक्षण पूर्ववत होईपर्यंत निवडणुका न घेण्याचा ठराव विधानसभेत एक मताने मंजूर करून घेऊन एक प्रकारे ओबीसी बांधवांच्या आरक्षणासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करणारे वेळप्रसंगी स्वतःला अटक होऊन सुद्धा या महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणासाठी कायदेशीर व रस्त्यावरची लढाई लढणारे एकमेव नेते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर हेच आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

     नाहीतरी कालपर्यंत जे स्वतःला ओबीसींचे नेते म्हणून घेण्यात धन्यता मानत होते असे सर्वच राजकीय पक्षाचे नेते ओबीसी आकडेवारी न्यायालयात टिकणार नाही असा दावा करणारे भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते आज ओबीसी आरक्षण मिळवून दिल्याचे श्रेय घेण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत आहेत.

बांठीया समर्पित मागासवर्ग आयोगाने राज्यभर विभाग वार सुनावणी घेतल्या या आयोगा पुढे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसी आरक्षण बाबत ड्राफ्ट सादर करण्यात आला परंतु इतर कुठल्याही पक्षांनी ड्राफ्ट आकडेवारी किंवा साधे निवेदनही दिले नाही .उलट भाजप ,राष्ट्रवादी काँग्रेस, व काँग्रेसचे नेत्यांनी बांठिया आयोगाने मतदार यादी तसेच आडनावे पाहून आकडेवारी गोळा करीत असल्याने बांठिया  आयोगाची आकडेवारी न्यायालयात टिकणार नाही असा दावा करीत आक्षेप घेत होते.

आज तेच नेते आम्ही करून ओबीसी आरक्षण मिळवून दिल्याचा हास्यस्पद दावा करीत असून ओबीसी बांधवांनी ह्याच नेत्यांची गेली महिनाभरात केलेली वक्तव्य तपासून पहावे. मात्र वंचित बहुजन आघाडीने सातत्याने ओबीसी आरक्षण हा विषय लावून धरून दिनांक 28 मे 2022 रोजी ओबीसी आरक्षणाबाबत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या स्वाक्षरीने बांठिया आयोगाला ड्राफ्ट सादर करण्यात आला. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर ध्येय वर्धन पुंडकर वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र दादा पातोडे वंचित बहुजन आघाडी प्रदेश महिला उपाध्यक्ष डॉक्टर निशाताई शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मात्र इतर राजकीय पक्षाच्या ओबीसी नेत्यांनी या आयोगाच्या कामकाजावर थेट मंत्रिमंडळात आणि पत्रकारांपुढे आकडेवारी टिकणार नसल्याची तसेच कमी आकडेवारी दाखवली असा दावा करणारे या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताच रंग बदलण्यात सर्ड्यालाही मागे टाकले आहे.

त्यामुळे परळी शहरांमध्ये वंचित बहुजन युवा आघाडी परळी शहर च्या वतीने ओबीसी समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी परळी शहरांमध्ये पेढे वाटून दिनांक 25 /07 /2022 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांच्या वतीने करण्यात येत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या