💥हिंगोली जिल्हा रुग्णालयासह वसमत शासकीय रुग्नालयातील आक्सिजन प्लांट व आक्सिजन निर्मिती प्रकल्प राम भरोसे...!


💥शासनाने करोडो रुपये खर्चून उभारलेल्या प्लांटला टेक्निशियनच नाही💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली  

हिंगोली जिल्ह्यात मागील कोवीड-19 काळामध्ये शासकीय रुग्णालयातील व उप जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय येथे वसमत या  ठिकाणी कोवीड रुग्णांना आक्सिजन ची अत्यंत आवश्यकता होती त्यामुळे हिंगोली जिल्हा प्रशासनाने करोडो रुपये खर्च करून  आक्सिजन (LMO) प्लांट व आक्सिजन निर्मिती प्लांट (PSA)ची मोठ्या प्रमाणात  प्रतेक ऊपजिल्हा रूग्नालयात उभारणी केली व त्या प्लांट ला हाताळण्यासाठी प्रशिक्षित टेक्निशियनची भरती करण्यात आली होती. 

 त्यामुळे उभारणी करण्यात आलेले प्लांट सुरळीत चालू होते. व पेशंटला सुरळीत ऑक्सिजन पुरवठा झाला. मात्र जिल्हा प्रशासनाने भरती करण्यात आललेले सर्व टेक्निशियन यांना कामावरून कमी करण्यात आले त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट वाऱ्यावर सोडले गेले आहेत. त्यांना हातळण्यासाठी रुग्णालयामध्ये प्रशिक्षित टेक्निशियन मनुष्यबळ उपलब्ध नाही. शासनाने करोडो रुपये खर्चून  उभारणी करण्यात आलेल्या प्लांटला टेक्निशियन ची अत्यंत आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावे अन्यथा  जेनेकरुन आपल्या वसमतसह  हिंगोली जिल्ह्या मध्ये नाशिक,सोलापूर सारखे अपघात होणार नाही व पूर्ण प्लांट व्यवस्थित रित्या सुरळीत चालू  राहतील आणि भविष्यात या ऑक्सीजन प्लांट चा उपयोग होईल.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या