💥पुर्णा नगर परिषदेच्या बेजवाबदार अधिकारी/कर्मचाऱ्यांनी मतदार याद्यांमध्ये केला गोंधळ....!


💥शहरातील विविध प्रभागातून आले 450 आक्षेप अर्ज💥

पुर्णा (दि.०४ जुलै) - नगर परिषदेच्या 2022च्या सार्वञिक निवडुकीच्या दुष्टीने नगर परिषदेने  शहरातील मतदाराच्या याघा तयार करण्यात  आल्या असुन या यादीत गोंधळात गोंधळ  उडाल्याने इच्छुकामधुन  हमरी तुमरी होत असताना दिसुन आले आहे. निवडणूक  आयोगाने घोषीत केल्यानुसार प्रभाग रचना आली अकरा  प्रभागामध्ये 23जागासाठी निवडणूक  होणार त्या बाबतीत  आरक्षण सोडतही झालीदि.21जुन रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात  आली त्यावर27जुन2022पर्यत आक्षेप घेण्यासाठी  वेळ देण्यात आली या वेळी मतदार यादीत मतदाराचेनावे परस्पर  इतरत्र  स्थलांतरीत केल्याने इच्छुक उमेदवारामधुन आक्षेप नोंदविला 450जणानी आपला आक्षेप दाखलकेल्यावर न.पचे मुख्यधिकारीअजय नरळे यांनी  आलेल्या  अर्जाची दखल घेऊन  प्रभागनिहाय पथक नेमुन त्याच्याकडुन दारोदारी जाऊन मतदार यादी सुधारणेचा कार्यक्रम  राबविला जात आहे.प्रभागाच्या प्रारुप  याघा प्रसिद्ध  होताच नविन मतदार यादी विकत घेऊन इच्छुक उमेदवारानी मतदार यादीचा अभ्यास सुरु केला आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी निवडणुक आयोगाने प्रभागरचना प्रभाग आरक्षण अणि प्रभागनिहाय मतदाराच्या याघा प्रसिद्ध  केल्या आहेत.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अगोदरच निवडणुका  लांबणीवर पडल्या  आहेत. परंतु  निवडणूक आयोगाकडुन कोणत्याही  क्षणी सार्वजञिक निवडणूकीची घोषणा केली जाण्याची  शक्यता  निर्माण  झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार  तयारिला लागले  आहेत.पुर्णा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अकरा प्रभाग तयार करण्यात  आले असुन प्रत्येक  प्रभागात दोन जागा निश्चीत करण्यात  आल्या आहेत.तर एका प्रभागातुन तीन या प्रमाणे23नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यातुन नगराध्याक्षाची निवड केली जाणार आहे.21जुन रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदाराची यादी प्रसिद्ध  करण्यात  आली आहे. इच्छुक उमेदवारानी मतदार यादी नगरपालीकेकडुन विकत घेऊन कोणाची  नावे कोठे आहेत?प्रभागात कोणत्या  समाजाची किती मते आहेत? स्थालातंरित  झालेल्या  मतदाराची संख्या ?कुठल्या प्रभागातील मतदाराचे नाव यादीत आले आहे.आपल्या  मर्जी तील कितीमतदार आहेत. आदिचा बारकाईने अभ्यास  सुरु केला आहे. नगरपालीकेची आगामी निवडणूकीसाठी  काँग्रेस . शिवसेना. भाजप व  राष्ट्रवादी काँग्रेस .वंचित  बहुजन विकास आघाडी. बसपा. अपक्षआदीनी तयारी सुरू  केली आहे. 23पैकी अनुसुचित जातीसाठी. एक अनुसुचित जमातीसाठी आरक्षित करण्यात  आले आहे. तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुकाचे  आरक्षण काढण्यात आल्याने  प्रत्येक  प्रभागात एक जागा सर्वसाधारण साठी आहे. परिणामी ही निवडणुक चुरशीची होईल. असा अंदाज आहे. नगरपालीका निवडणुकीत एक प्रभाग व दोन जागा वाढल्या  आहेत. पुर्वीच्या प्रभागाची मोठ्या  प्रमाणात  तोडफोड करुन एक  नविन प्रभाग तयार करण्यात आला आहे.त्यामुळे अनेक  मातब्बर उमेदवाराची हक्काची  मते इतरत्र गेल्याने अनेकजण अडचणीत  आले आहेत...



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या