💥हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे विज पडून एकाचा मृत्यु....!


💥जयपूर येथील नागनाथ दत्तराव पायघन वय 35 वर्ष यांचा विज पडून दुर्दैवी मृत्यु💥 

 शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे एका शेतकऱ्यांच्या अंगावर विज पडून मृत्यु झाला आहे शेतात काम करतांना अचानकपणे विजाच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली यात जयपूर येथील नागनाथ दत्तराव पायघन वय( 35 )वर्ष यांचा विज पडून मृत्यु झाला आहे  सदरील घटना दि 30/07/2022/रोजी दुपारी 1.30 मिनीटांनी घटली आहे 

हिंगोली जिल्ह्यात गेल्या 20 दिवसा पासून जिल्ह्यात सततधार पाऊस पडत आहे आज सकाळून पावसाने उघडीप दिल्याने नागनाथ पायघन शेतात काम करत होते मात्र दुपारी वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटासह  जोरदार पाऊस झाला व सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील शेतकरी नागनाथ पायघन यांचा मृत्यु झाला विज अंगावर पडल्याचे कळताच त्याना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र डॉक्टरानी त्याना मृत घोषित केले त्यामुळे गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या