💥वाशिम शहर पोलिस स्टेशन येथे अवैध दारू विक्री / वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई....!


 💥आरोपींसह ०३.८८ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी घेतला ताब्यात💥

वाशिम:-व्यसनांच्या विळख्यात अडकून समाजातील अनेक कुटुंबे उध्वस्त होत असून दारूच्या व्यसनापायी अनेकजण गुन्हेगारीचा मार्ग धरतात. समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे


याच पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली असून आरोपींकडून ०३.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पो.स्टे.वाशिम शहर हद्दीतील बाबा वाईन बार येथून एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडी मध्येमोठ्या प्रमाणात अवैधरीत्या देशी व विदेशी दारू भरून ग्रामीण भागामध्ये विनापरवाना विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून सपोनि. राजेशकुमार गाठे व पथकाने पंचांसमक्ष बाबा बारमधून बाहेर येत असलेल्या चारचाकी वाहन क्र.MH 04 GD 4904 ची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारू भिंगरी १० बॉक्स अंदाजे किंमत ३३,६००/-रु., मॅजिक मोमेंट विदेशी दारूचे ०५ बॉक्स अंदाजे किंमत ४४,८८०/-रु., विवो कंपनीचा मोबाईल अंदाजे किंमत ३०००/- रु. व निसान कंपनीची चारचाकी अंदाजे किंमत ०३ लाख रुपये असा एकूण ०३.८८ लाख रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेतला. सदर दारू बारमालक कैलास नामदेव मगर, रा. गुरुवार बाजार, वाशिम यांच्या सांगण्यावरून पंकज बबन शिंदे,रा. शुक्रवार पेठ, वाशिम हा अवैधपणे विनापरवाना वाहतूक करून अनसिंग परिसरातील धाब्यांवर विक्री करतो. त्यामुळे त्यांचेविरुद्ध पो.स्टे. वाशिम शहर येथे अप. क्र. ५३५ / २०२२ नुसार कलम ६५ (ई), ८३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे(IPS), उपविपोअ, वाशिम श्री सुनीलकुमार पुजारी, पो. नि. श्री. रफिक शेख, ठाणेदार, पो.स्टे. वाशिम शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. राजेशकुमार गाठे, सपोउपनि. रवींद्र राठोड, पो.कॉ. योगेश इंगोले यांनी पार पाडली. नागरिकांनी व्यसनांच्या आहारी न जाता निरोगी व व्यसनमुक्त जीवनाचा अवलंब करावा असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या