💥पुर्णेत प्रस्थापित लोकप्रतिनिधींनी बिएलओशी हितसंबंध जोपासत केली मतदारांची पळवापळवी.....!


💥शहरातील प्रभाग क्र.०६ मधील असंख्य मतदारांची नाव खोटे पंचणामे करीत पळवली प्रभाग क्र.०५ मध्ये💥  

💥नगर परिषद मुख्याधिकारी अजय नरळे यांनी बजावली बीएलओ घाटोळ यांना खुलासा करण्या संदर्भात नोटीस💥

पूर्णा (दि.२२ जुलै) - स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगर परिषद निवणूकीची पुर्व तय्यारी म्हणून निवडणूक विभागाने प्रभाग रचनेसह मतदार नोंदणीसह नवीन मतदार याद्यांच्या निर्मितीचा कार्यक्रम हाती घेतला असून त्या अनुषंगाने मतदार याद्यांच्या निर्मिती सुरूवात झाली असतांना स्वतःच्या सोईनुसार आपआपली प्रभाग रचना व हक्काचे मतदान सुरक्षित करण्याकरिता प्रस्थापित लोकप्रतिनिधींनी देखील कंबर कसल्याचे निदर्शनास येत असून स्थानिक बिएलओशी आर्थिक हितसंबंध जोपासत आपल्याला अपेक्षित असलेल्या मतदारांची नाव आपल्या प्रभागात कशी ठेवता येईल आणि संभाव्य विरोधी उमेदवाराच्या मतदात्यांची नाव कश्या पध्दतीने इतर प्रभागाच्या मतदान यादीत ढकलता येतील अश्या पध्दतीचे कुटील कारस्थान सोईस्कररित्या आखल्या जात असल्यामुळे शहरातील अनेक प्रभागांतील स्थानिक मतदारांचे अन्य प्रभागातील रहिवासी असल्याचे खोटे पंचणामे सादर करून शेकडो मतदार या प्रभागातून त्या प्रभागात पळवल्या जात असल्याचा गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.


शहरातील प्रभाग क्र.०६ मधील बिएलओ घाटोळ यांनी केल्यामुळे नगर परिषद मुख्याधिकारी अजय नरळे यांनी संबंधित बिएलओ घाटोळ यांना पंचनामा करून ही मतदारांची नाव मतदार यादीत न टाकल्याचा कारणा वरून यादी भाग क्र.१८५ चे बीएलओ घाटोळ यांना नोटीस द्वारा खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे पूर्णा शहरातील यादी भाग क्र.१८५ चे बिएलओ यु.एल.घटोळ यांनी महावीरनगर येथील बसवेश्वर चौक परिसरातील स्थानिक रहिवासी राजेश नथूलाल सेन हे प्रभाग क्र.०६ चे रहीवासी असतांना सुद्धा अक्षरशः पंचनाम्यात खडाकोड करून त्यांच्या नावाचा समावेश प्रभाग ०५ च्या अंतिम यादीत समाविष्ट केला आहे.

त्यांनी केलेला पंचनामा व अहवाला मधील अनुक्रमांक जुळत नाही त्यामुळे याचा खुलासा समक्ष लेखी स्वरूपात करावा अन्यता आपल्यावर कार्यवाही करण्यात येईल अशी नोटीस मुख्याधिकारी अजय नरले यांनी बीएलओ घटोळ यांना बजावली असल्यामुळे प्रस्थापित लोकप्रतिनिधी व बिएलओ यांच्यातील हितसंबंध पुन्हा एकदा उघड झाले असून शहरातील प्रत्येक प्रभागाच्या मतदार याद्यांमध्ये अश्या प्रकारे स्थानिक मतदारांच्या नावांची पळवापळवी झाल्याने जनसामान्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रभाग क्र.०६ मधील शेकडो स्थानिक मतदारांच्या नावांची प्रस्थापितांच्या इशाऱ्या वरून पळवापळवी झाल्याचे निदर्शनास येत आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या