💥पुर्णेतील छत्रपती संभाजी महाराज चौकातील अतिक्रमण तात्काळ काढण्याची मागणी...!


💥छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेडने निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली मागणी💥

पुर्णा (दि.०४ जुलै) - शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे अशी मागणी छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेडने आज सोमवार दि.०४ जुलै २०२२ रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

 छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेडचे बाबद तालुकाध्यक्ष शिवश्री गंगाधर कदम यांच्या नेतृत्वाखालील शिस्टमंडळाने आज पुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी नरळे यांना निवेदन देऊन छत्रपती संभाजी महाराज चौकातील अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी केली यावेळी   शिवश्री करण शिंदे,गंगाखेड विधानसभा अध्यक्ष,शिवश्री भरत बोबडे,शिवश्री, राजु जोगदंड,कंटीराम बोबडे, व्यंकटी ढोणे,बालाजी हिलाल,गोपाळ डाखोरे, सदाशिव बोबडे, महेश कदम, स्वप्नील कदम,आदींची यावेळी उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या