💥पुर्णा तालुक्यातील गौर ग्रामपंचायत प्रशासनाने विकासाच्या नावावर ग्रामस्थांना दिली चपराक....?


💥गावातील विकासाच्या नावाने शासकीय विकासनिधीला लावली राख : गावातील रस्ते नाल्यांसह पाणीपुरवठा योजनाही गडप💥


(भाग क्र.०१) : गाव तस चांगल पण.....

✍🏻परखड सत्य :- चौधरी दिनेश -

पुर्णा ; श्री.सोमेश्वर महादेव देवस्थान या जागृत देवस्थानामुळे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात देखील परिचित असलेले पुर्णा-नांदेड राज्य मार्गावरील तब्बल चार ते साडेचार हजार लोकवस्तीचे गौर हे गाव..गावातील जागृत सोमेश्वर महादेव व परिसरातील हेमाडपंथी बारव या गावाचे वैभव परंतु या गावासह येथील ग्रामस्थांचे सर्वात मोठे दुर्दैव की या गावचा विकास करण्यासाठी ग्रामस्थांनी ज्यांच्यावर विश्वास टाकून आपल्या मतदानातून त्यांना आपले प्रतिनिधी म्हणून निवडून दिले तेच शेवटी या गावाच्या विकासाचे कर्दनकाळ ठरले म्हणतात 'ग्रामस्थांसह गाव तस भलतच चांगल पण भ्रष्ट बेईमान राजकारणी अर्थात लोकप्रतिनिधी आणि भ्रष्ट नौकरशहांनी अक्षरशः वेशीला टांगल' जागृत देवस्थान असलेल्या सोमेश्वर महादेवासह येथील वनशहीद स्व.सदाशिव महादेवआप्पा नागठाणे यांच्या नावावर देखील गौर ग्रामपंचायत सरपंच पारवे व ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांनी लाखो रुपयांची अफरातफर केल्याचे निदर्शनास येत आहे.


गौर गावच्या विकासाच्या नावावर अक्षरशः कंबरेच सोडून डोकश्याला बांधलेल्या या भ्रष्ट बेईमानांच्या बेईमानीला जिल्हा परिषद/पंचायत समिती कार्यालयातील गेंड्याची कातडी पांघरूण निर्लज्ज झालेल्या भ्रष्टाचारी अधिकारी/कर्मचाऱ्यांचे देखील खंबीर पाठबळ मिळत असल्यामुळे 'तुम्ही करा बकबक आम्ही आहोत निब्बरगट्ट' अशी अवस्था गौर ग्रामपंचायत सरपंचपती अर्थात सरपंच प्रतिनिधी अनंता पारवे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांची झाली असून मागील सन २०१७ ते २०२१/२२ या त्यांच्या कालावधीत केंद्र सरकार व राज्य सरकारसह राज्यसभा/विधान परिषद सदस्यांच्या वैयक्तिक निधीतून देखील गौर ग्रामपंचायतीला गौर गावाच्या सर्वांगीन विकासासाठी करोडो रुपयांचा विकासनिधी प्राप्त झाल्यानंतर देखील आज संपूर्ण गौर गावाची अवस्था अक्षरशः चिख्खलवाडी सारखी झाल्याचे निदर्शनास येत असून सरपंच पारवेंची अवस्था चिखलातल्या कमळाप्रमाणे 'कुणी काहीही म्हणा अन् दडपून हाणा' भारत सरकार पंचायत राज मंत्रालयाच्या ई-ग्रामस्वराज्य वेबसाईटवरील गौर ग्रामपंचायत कार्यालयाला आलेल्या विकासनिधीचा सखोल अभ्यास केल्यास असे निदर्शनास येते गौर ग्रामपंचायतीला आलेल्या गावाच्या विकासनिधीचा खऱ्या अर्थाने सद्उपयोग झाला असता तर संपूर्ण गावासह परिसरातील शेतशिवार देखील विकसित झाली असती परंतू आलेल्या प्रत्येक शासकीय विकासनिधीची कश्या पध्दतीने विल्हेवाट लावता येईल याचेच सुनियोजित नियोजन लावल्या गेल्यामुळे आज गावातील रस्त्यांच्या नाल्यासह बंदिस्त नाल्यांच्या बांधकामासाठी लाखो रुपयांचा निधी,गावातील पाणीपुरवठा योजनेसह आरो प्रणालीसाठी लाखो रुपयांचा निधी, प्राथमिक आरोग्य केंद्र समाजमंदीर संरक्षण भिंत उभारणी सुशोभिकरणासाठी लाखोंचा निधी तरीही संपूर्ण गावाची अवस्था एखाद्या आदीवासी पाड्यागत अविकसित गावासारखी अहो गावचा विकास तर सोडा गावातील जागृत ग्रामदैवत असलेल्या सोमेश्वर महादेव देवस्थानाच्या बारव दुरूस्तीसाठी आलेले लाखो रुपयांची देखील यांनी पंचायत समिती/जिल्हा परिषदेतील भ्रष्ट बेईमान अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या कृपा आशिर्वादाने अक्षरशः लुटमार केली यानंतर देखील या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या ग्रामपंचायतीला आर.आर.पाटील सुंदर ग्राम पुरस्कार (स्मार्ट ग्राम योजना अंतर्गत),संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार, अन् उत्कृष्ट कामगिरी बजावल्या बाबत ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांना देखील पुरस्कार वारे...प्रशासन ग्रामीण भागाच्या विकासाच्या नावावर कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी कागदोपत्री लाटणारी भ्रष्टाचाऱ्यांची साखळीच जनू तालुक्यासह जिल्ह्यात कार्यरत झाली आहे....  



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या