💥सेनगाव येथील शिवसैनिक आक्रमक खा.हेमंत पाटील शिंदे गटात गेल्यामुळे पाटील यांच्या फोटोला जोडे मारून केले दहन...!


💥शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी केले खा.पाटील यांच्या फोटोचे दहन💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली

शिवसेनेची आत्ता पर्यन्त एकनिष्ठ  असणारे   खासदार हेमंत पाटील आज शिंदे गटात दाखल झाले आहेत त्यामुळे हिंगोली सेनगाव येथील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत सेनगाव येथील तहसीलचा समोर हेमंत पाटील यांच्या पुतळ्याचे जोडे मारून दहन करण्यात आले शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वात सेनगाव शहरांमध्ये हिंगोली लोकसभेचे शिवसेनेचे बंडखोर खासदार हेमंत पाटील यांच्या पुतळ्याचे सेनगाव येथील  शिवसेनेच्या वतीने दहन करण्याचा पुतळा दहन करण्यात आला यावेळी शिवसेना शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख युवा सेना जिल्हा समन्वयक प्रवीण जी महाजन युवा सेना तालुकाप्रमुख जगदीश जी गाढवे शिवसेना नेते रंजीत देशमुख शिवसेना जेष्ठ नेते गंगाराम जी फटांगळे नगरसेवक वैभव देशमुख शिवसेना जेष्ठ नेते दिलीपरावजी कुंदर्गे फिरोज पठाण युवा सेना उपतालुकाप्रमुख मुरलीधर गव्हाणे युवा सेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख सचिन जाधव करण देशमुख विलास सुतार गणेश रंजवे व आदी शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या