💥मुलींना पराटे येण्याबरोबर कराटे येणे महत्त्वाचे - प्रियंका सरनाईक


💥मुलींना आपले स्वतःचे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून संरक्षण कसे करावे याचे विशेष प्रशिक्षण दिले💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली

सापटगाव येथील महिला प्रशिक्षक प्रियंका सरनाईक यांनी विद्यानिकेतन प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कोळसा येथील मुला- मुलींना कराट्याचे प्रशिक्षण दिले. त्यामध्ये त्यांनी मुलींना आपले स्वतःचे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून संरक्षण कसे करावे याचे विशेष प्रशिक्षण दिले.


         यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ साहेब यांनी प्रियंका सरनाईक व त्यांची आई शारदा सरनाईक यांचा सत्कार केला व शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. यावेळी सापटगाव चे तेजराव अवचार,प्रकाश शिंदे,कवी शिवाजी कह्राळे, पवन शिंदे उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अभिषेक भैय्या बेंगाळ माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. सानप एस.एस. प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सरकटे व्ही.एस. आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री बाजगीरे बी. जी.पर्यवेक्षक कसाब पी.पी. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या