💥अशोक चव्हाणांनी शिख समाजाचा विश्वासघात केल्याचा शिख समाज बांधवांचा आरोप...!


💥चव्हाण यांनी सरकार पडण्याच्या शेवटी सायंकाळी पसरीचा यांना एकटे प्रशासक म्हणून नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डावर लादले💥

 नांदेड (दि.०८ जुलै) - गुरुद्वारा बोर्डाशी संबंधीत विविध मागण्यांसाठी बसलेल्या उपोषणार्थींना,मोठी आश्वासने देणाऱ्या अशोक चव्हाणांनी कृतीतून शिख समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप उपोषणार्थींनी केला आहे.

          तत्कालीन भाजपा शासनाने गुरुद्वारा बोर्ड कायदा 1956 मधील कलम 11 मध्ये  केलेले  संशोधन रद्द करण्यासाठी व स्थानिक गुरुदारा बोर्ड गठीत करण्यांसह इतर अन्य मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने, उपोषण, धरणे प्रदर्शन शीख समाजाच्या वतीने करण्यात आले. मागील 23 जून 22 पासून 29 जून 22 पर्यंत बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व हजुरी साध संगतच्या वतीने साखळी उपोषण सुरू केले होते.उपोषणाच्या सहाव्या दिवशी तत्कालीन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट देऊन, आपण केलेल्या सर्व मागण्या आम्हास मान्य आहेत. येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही एक शिष्टमंडळ घेऊन मुंबईला या, मी स्वतः व दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे आणि तुमचे शिष्टमंडळ घेऊन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात  यांची भेट घेऊन ह्या सर्व मागण्या मान्य करून घेऊ. माझ्यावर विश्वास ठेवा असे आश्वासन देऊन, उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी पाजून उपोषण सोडवले होते.

परंतु चव्हाण यांनी आमच्या ह्या सर्व मागण्या मान्य तर करवून घेतल्याच नाहीत,उलट आमच्या एका मागणीचा आधार घेत,कार्यरत बोर्ड बरखास्त करुन आपले हस्तक असलेल्या पसरीचा यांना, महाविकास अघाडीचे सरकार पडण्याच्या शेवटी संध्याकाळी 7.00  वाजता एकटे प्रशासक म्हणून नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डावर लादले. शीख समाजाच्या वतीने वेळोवेळी केलेल्या मागण्या व अन्य सर्व मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांना चव्हाण यांनी दोन वेळा खोटे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास भाग पाडले.या कृतीने त्यांनी काँग्रेस पक्षातील आणि महाविकास आघाडीतील शीख  कार्यकर्त्यांसह संपूर्ण समाज  बांधवांचा विश्वासघात  केला आहे.यामुळे शिख समाजामध्ये चव्हाण बद्दल प्रचंड नाराजी पसरलेली आहे. कारण ही कलम 11 मागील फडणवीस सरकार ने शिख समाजावर लादलेली आहे व सध्या राज्यामध्ये भाजप व शिंदे गटाचे सरकार बनलेले आहे. आता हे सरकार आमची मागण्या पूर्ण करेल का ? हाही मोठा प्रश्न  समाजाच्या मनात उद्भवलेला आहे.

मागील वर्षी 29 मार्च रोजी, काही  मोजक्या लोकांनी शीख समाजाला गालबोट लावण्याचा काम केलेले आहे.त्या वेळीसुद्धा चव्हाण साहेबांनी  शीख समाजाची कोणतीही मदत केलेली नाही. 29 मार्च होल्ला महल्ला मिरवणूकीतील निर्दोष व्यक्तींवर व विद्यार्थ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले. त्यावेळी सुद्धा शीख समाजाची आशा आणि मदार नांदेडचे भूमिपुत्र असलेल्या  चव्हाण साहेबांवर होती.मात्र चव्हाण साहेबांनी काहीही आणि कोणतीच मदत केली नाही. कसलाच दिलासाही दिला नाही.उलट  राज्यपालांनी स्वताः येऊन  गुरुद्वारात मथ्था टेकला.त्यावेळी काही शीख बांधवांनी राज्यपालांना भेटून निवेदन देत,खोट्या गुन्ह्यातून निर्दोष व्यक्तींना वगळण्याची विनंती केली होती.त्या अनुषंगाने राजभवनाने नांदेड पोलिसांनी यावर लक्ष देवून कृती करण्याबाबत पत्रही पाठवले होते.चव्हाण साहेबांनी खरेच मनावर घेतले असते, तर तेव्हाही राज्यपालांच्या पत्राचा आधार घेत,निरपराध शीख  बांधवांवरचे खोटे गुन्हे मागे घेता आले असते.पण तेथेही चव्हाण साहेबांनी शीख समाजाकडे पाठ फिरवली. त्यामुळे आता चव्हाण साहेबांना शीख  समाज फक्त मतदाना पुरताच हवाआहे का? हा प्रश्न  शिख समाजाच्या मनात ऐरणीवर आला आहे. ह्या सर्व बाबी लक्षात ठेवूनच, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच चव्हाण साहेबां विरुद्ध मतदान करण्याची समाजाची मानसिकता वाढत आहे,असा संशय राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष स. मनबीरसिंघ ग्रंथी, स.जसपालसिंघ लांगरी, स.बीरेंद्रसिंघ बेदी, स.बंदीछोडसिंघ खालसा, प्रेमजितसिंघ शिलेदार यांनी व्यक्त केला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या