💥गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव शिवारातील आखाड्यावर रात्रीचा सिंगल फेज वीजपुरवठा सुरू....!


💥आम आदमी पार्टीच्या पाठपुराव्याला अखेर यश💥

 गंगाखेड/ प्रतिनिधी 

मागील सहा महिन्यापासून मरडसगाव शिवारातील शेती फिटरला वीज पुरवठा करणाऱ्या फिडरवरून रात्रीचा वीजपुरवठा बंद झाला होता. तो काल 25 जुलैपासून सुरू झाल्याने शेतकऱ्यात समाधान व्यक्त केले जात आहे. आम आदमी पार्टीने यासाठी पाठपुरावा केला होता.

 मरडसगावं शिवारात 33 केव्ही उपकेंद्र आहे. या उपकेंद्रावरील एक फीडर मरडसगाव, नरळद ,गोपा वाघलगाव, पारधवस्ती, आनंदवाडी, विठ्ठलवाडी आदी शिवारातील शेतातील विहिरी, बोर ,आखाडे यांना वीज पुरवठा करते .या फिडरवर एकही घरगुती मीटर नव्हते. त्यामुळे या फिटरला कृषी फिटर असे नाव देत महावितरण कृषी फिडरला सिंगल फेज ची गरजच काय ?असं म्हणत वीजपुरवठा बंद केला होता. त्यामुळे या भागातील शेतकरी परेशान होते. या भागात जास्तीत जास्त शेतकरी कुटुंबासह आकड्यावर राहतात मोबाईल चार्जिंग विद्यार्थ्यांचा अभ्यास आदीसाठी अडचणी येत होत्या. काही शेतकऱ्यांनी मोठे मोठे लोकप्रतिनिधीकडे जाऊन आपले गाऱ्हाणे मांडले होते. मागील 16 जून रोजी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर ,मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिसे , वाघलगाव चे माजी सरपंच नारायणराव घनवटे आदींनी महावितरणचे उपविभागीय अभियंता वावळे यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाराची दखल घेत महावितरण ने काल 25 जुलैपासून या कृषी फिटर वरील रात्रीचा सिंगल फेज वीजपुरवठा सुरू केला. या पुरवठ्याने शेतकऱ्यात समाधान व्यक्त केले जात आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या