💥विशाल व्यायाम शाळा येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली...!


💥या कार्यक्रमास पैलवान गोपाळ मोठे यांची प्रमुख उपस्थिती💥 

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली : आज विशाल व्यायाम शाळा येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळेस सर्व पैलवान मंडळींनी त्यांचे गुरुवर्य वस्ताद भरतजी चौधरी, रमेशजी काका यांचं गुरुपूजन करून कार्यक्रमला सुरुवात केली. त्या वेळी कार्यक्रमचे सूत्रसंचालन हे साहू सरांनी केले. तर कार्यक्रम प्रसंगी हभप संजय महाराज पडघान यांचं व्याख्यान झाले, संजय महाराजांनी आपल्या व्याख्यानात गुरु शिष्य महिमा, गुरुचे महत्व, सध्याचा युवा वर्ग आणि त्यांच्या जीवनातील गुरुचे महत्व इ विषयावर  प्रकाश टाकला. कार्यक्रमामध्ये पै.राजू बोरा, पै.प्रकाश झाडें, पै.सलीम इ. पैलवानाणी मनोगत व्यक्त केले...

या कार्यक्रमास सर्वश्री पैलवान गोपाळ मोठे, माधव सपाटे,अभिजित पवार, रामप्रसाद टेकाळे, उद्धव पवार,पवन मडले, संजय झाडें, रवी चौधरी, राजेश कुरील, अचल चौधरी, श्याम बांगर, प्रकाश झाडें,गणेश बांगर, संजय मांडगे, गजानन भोयर, विठ्ठल मांडगे, रमेश मांडगे, रमेश शिंदे, प्रदीप ठाकरे, संदीप मोरगे, विकी चौधरी, तुळजेश कुरील,धाबे साहेब,रुपेश धाबे इ. उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल व्यायाम शाळा येथील सर्व पैलवानाणी प्रयत्न केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या