💥पुर्णेत गाढवीनींच्या शोधात गाढव झाली सैराट : धावताय रस्त्याने मानसांना तुडवत सुसाट....!


💥शहरासह ग्रामीण भागातही गाढवांच्या टोळ्यांचा वाढलाय थाट शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची देखील लावताय वाट💥


✍🏻विशेष वृत्त : चौधरी दिनेश

पुर्णा (दि.२१ जुलै) - पुर्णा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात देखील मोकाट गाढवांच्या असंख्य टोळ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालीच जनसामान्यांसह शेतकरी वर्गाचे जगने असह्य केल्याचे निदर्शनास येत असून तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीररित्या रेतीचे उत्खनन करून त्या चोरट्या रेतीची गाढवांच्या साहाय्याने तस्करी करण्याचा गोरखधंदा सुरू केलेल्या अती शहाण्या अवैध रेती तस्करांनी प्रशासनाच्या डोळ्यात धुळ झोकण्यासाठी गाढवांचे मालकत्व/पालकत्व स्विकारीत चक्क गाढवच खरेदी करण्यास सुरूवात केल्यामुळे शहरासह ग्रामीण भागात देखील गाढवीनींच्या शोधात अक्षरशः गाढव सैराट होऊन गाढवीनींचा शोध लागत नसल्यामुळे एकमेकांच्या मागे धावत सुटत कुरघोडी करीत असल्यामुळे रस्त्याने पाई फिरणाऱ्या अबाल वृध्द महिलांसह दुचाकी स्वारांनाही आपला जिव मुठ्ठीत घेऊन फिरावे लागत असून सदरील मोकाट गाढव एकमेकांच्या मागे धावतांना पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांना देखील अक्षरशः तुडवत असल्यामुळे अनेक नागरिक या सैराट झालेल्या गाढवांमुळे जख्मी झाल्याचे तर अनेकांना चक्क आपल्या हाता-पायाची हाड मोडून घ्यावी लागल्याचे निदर्शनास येत आहे.


पुर्णा तालुक्यात पुर्वी नदीपात्रातून रेती काढून रेती तसेच मातीची वाहतूक करीत आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी वढार,कैकाडी या भटक्या विमुक्त समाजातील लोक असंख्य गाढवांसह काही मादी गाढवांचे देखील पालन करीत असत परंतु त्यांच्या या पारंपारिक व्यवसायावर सर्वच समाजातील संधीसाधू रेती तस्करांनी वक्रदृष्टी करीत केवळ गाढवांच्या टोळ्या खरेदी करीत रेती तस्करीला सुरूवात केल्यामुळे शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात देखील अनेक रेती तस्करांनी शेकडो गाढव खरेदी केली संबंधित रेती तस्कर पहाटेच्या सुमारास या गाढवांचा वापर रेती वाहतूकीसाठी करीत असून दुपार नंतर मात्र सदरील गाढव मोकाट सोडून देत असल्यामुळे ही असंख्य गाढव शहरातील सार्वजनिक ठिकाणांसह रहदारीच्या रस्त्यांवर अक्षरशः सैराट होऊन एकमेकांवर कुरघोडी करीत दुचाकीस्वारांसह पादचारी नागरिकांना देखील तुडवत असल्यामुळे अनेक जन जखमी होत असल्याचे निदर्शनास येत असून असाच एक गंभीर प्रकार झिरो टी पॉईंट परिसरात दि,१४ जुलै २०२२ रोजी रात्री ०८-०० ते ०८-१० वाजेच्या सुमारास घडला तालुक्यातील मौ.कंठेसश्वर येथील सतीष भारती हे या परिसरात मोबाईलवर बोलत असतांना परिसरात सैराट होऊन धुमाकूळ घालणाऱ्या गाढवांनी त्यांना अक्षरशः तुडवल्याने ते गंभीर जखमी झाले यावेळी आसपासच्या नागरिकांनी त्यांना तात्काळ बाजूला उचलून नेत दवाखान्यात नेल्यामुळे मोठा अनर्थ टळला असे प्रकार शहरासह ग्रामीण भागातील सार्वजनिक रस्त्यांसह शहरातील नागरी वसाहतींमध्ये सातत्याने घडत असून सैराट झालेली असंख्य गाढव कर्णकर्कश आवाज काढीत एकमेकांच्या मागे धावत धुमाकूळ घालीत असल्यामुळे नागरिकांना दिवसा सार्वजनिक रस्त्याने फिरने तर रात्रीच्या वेळेला सुखाने झोपणे देखील अवघड झाले असून याच गाढवांच्या टोळ्या शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांवर देखील तुटून पडत असल्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाल्याचे निदर्शनास येत असून अश्या या मोकाट गाढवांच्या टोळक्यांचा नगर परिषद प्रशासन तसेच तहसिल प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करीत गाढव पाळणाऱ्यांवर देखील कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे......  टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या