💥जिंतूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिले तहसिलदारांना निवेदन....!


💥सुडभावनेतून ईडीचा गैरवापर करीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना लक्ष बनवल्या जात असल्याचा केला निषेध💥

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची मागील काही दिवसांपासून ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. यावरून देशभरातील काँग्रेस नेते आक्रमक झाले असून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचे आरोप केले आहे. त्यातच दि. २६ जुलै रोजी पुन्हा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. सोनिया यांच्या चौकशीच्या वेळी दिल्लीसह संपूर्ण भारतामध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले आहे.

केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांना ई.डी कार्यालयात दि. २६ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस दिली आहे. या विरोधात मंगळवार दि. २६ जुलै रोजी तहसीलदार जिंतूर यांना निवेदन सादर करण्यात आले. व सदर ई डी कारवाई थांबवण्यात आली नाही. तर कॉग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले.

या प्रसंगी काँग्रेस तालुका अध्यक्ष गणेशराव काजळे, जि. प. सदस्य अविनाश काळे, म.प्र. काँग्रेस उपाध्यक्ष ओबीसी केशवराव बुधवंत, जिंतूर सेलू विधानसभा अध्यक्ष कॉंग्रेस रामजी घुगे, तालुका उपाध्यक्ष कृष्णा राऊत, तालुका संघटक इर्शाद पाशा चांद पाशा, महेश सांगळे, बाळासाहेब फाटे, सिताराम चांदणे उपसरपंच पांगरी, उमाजी साखरे, कामीटे या सह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या