💥महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळ विस्तारात आमदार मेघनाताई बोर्डीकर यांना संधी द्यावी....!



💥पुर्णा तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी💥


 
पूर्णा (दि.०६ जुलै) :- शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या एकमेव आमदार मेघना दीदी बोर्डीकर या असून त्या जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे  प्रतिनिधित्व करीत आहे.शिवसेनेच्या बालकिल्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी मेघना बोर्डीकर यांना मंत्री करणे  काळाची गरज आहे यासाठी आमदार मेघना बोर्डीकर या उच्चशिक्षित असून त्या सदैव शेतकरी व सामान्य नागरिकांचा विकासाच्या कामासाठी सदैव अग्रेसर दिसून आले आहे त्यांच्या या अहोरात्र पक्ष वाढीचा कामासाठी त्यांना फळ म्हणून मंत्रीपद देऊन भाजपाची ताकद मिळावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा संयोजक विजय कराड व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विनय कराड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.अनेक वर्षापासून परभणी जिल्ह्यात बाहेरचेच पालकमंत्री म्हणून नियुक्त केले जातात बाहेरच्या पालकमंत्र्यांमुळे परभणी जिल्ह्याचा विकास खुंटला आहे कारण त्यांना जिल्ह्याच्या विकासाशी काही घेणं देणं नसते 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दोन दिवशी होणारे झेंडावंदन वर्षात एखादी जिल्हा नियोजन समिती बैठका या कार्यक्रमापुरते ते पालकमंत्री म्हणून हजेरी लावताना.जिल्ह्यातील अनेक विकासाचा प्रश्न बाहेरचा पालकमंत्र्यामुळे हा मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाहीत परभणी जिल्ह्याचा विकास नेहमीच वंचित राहिला आहे कारण बाहेरचे पालकमंत्री हाच सगळ्यात मोठा अडथळा आहे आपल्या जवळचा जालना हिंगोली या जिल्ह्याचा विकास होत आहे परंतु परभणी हा विकासा पासून वंचितच राहत आलेला आहे शिंदे-फडवणीस सरकारने आमदार मेघनादीदी बोर्डीकर यांना मंत्रिपद व जिल्ह्याचे पालकमंत्री देऊन अनेक वर्षापासून विकासापासून दूर असलेले राहिलेले परभणी जिल्ह्यामध्ये अनेक अन्याय झालेले हे पूर्ण प्रश्न दूर करतील अशी अपेक्षा व्यक्त करत आहे आमदार मेघना बोर्डीकर यांची मंत्रिमंडळात वर्गीनी लागल्यास त्यांच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याचा विकास होईल अशी अपेक्षा आहे.विकासाला चालना देण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब आपण दीदीना न्याय द्यावा ही विनंती.परभणी जिल्ह्याला मंत्रीपदाची आवश्यकता  असून शिवसेनेचे बालेकिल्ल्यात भाजप आपली ताकद वाढवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील एकमेव आमदार असलेल्या माननीय आमदार मेघना दीदी बोर्डीकर यांना बळ देऊन परभणी जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मंत्रीपद द्यावे  व त्यांना परभणीच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करावी ही विनंती करणार पत्र पाठवले आहे यापत्रा वर भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब कदम,प्रदेश कार्यकारणी सदस्य बळीराम कदम,जिल्हा संयोजक विजय कराड,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अजय ठाकूर,तालुकाध्यक्ष अनंतराव पारवे,शहराध्यक्ष प्रशांत कापसे,युवा जिल्हा उपाध्यक्ष विनय कराड,कपिल कदम,तालुका सरचिटणीस नरहरी ढोणे,युवा तालुकाध्यक्ष देवानंद वळसे,युवा शहराध्यक्ष विश्वनाथ होळकर,तालुका संयोजक अड.गोविंद ठाकूर आदीच्या स्वाक्षरी आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या