💥महाराष्ट्राचे मा.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिंतूरात वृक्षारोपण करून हनुमान चालीसा पठण....!


💥त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना करण्यात आली💥

 जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर

महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री समाजभूषण सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिंतूर तालुक्यातील बोरी येथील वट्टमवार जिनिंग प्रेसिंग येथे वृक्षारोपण करून हनुमान चालीसा पठण करण्यात आले जिंतूर येथील एमआयडीसी मध्ये राजेश वट्टमवार व मंदार पेट्रोल पंपावर वृक्षरोपण केले. आणि त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना करण्यात आली लवकरच त्यांचा येथे मंत्रिमंडळात विस्तारात समावेश व्हावा अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करून भगवंताच्या चरणी प्रार्थना करण्यात आली आहे.

त्या वेळी आर्य वैश्य समाजातील व्यापारी अध्यक्ष किरण वट्टमवार, महारष्ट्र महासभेचे प्रसिद्दी प्रमुख प्रदीप कोकडवार, मुकुंद कोकडवार, रविकांता कोकडवार, दीपक वट्टमवार, सुनील वट्टमवार, ओमप्रकाश रायपत्रीवार,रुपेश चिद्रवार, कृष्णा चिद्रवार,अशोक चिद्रवार, उमाकांत कवठेकर, सचिन रयपत्रिवार, संजय वट्टमवार,आदी समाज हजर होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या