💥परभणी जिल्ह्यात पोलिसांनी पकडलेला तांदूळ गुडगावच्या प्रयोगशाळेत पाठवा....!


💥छत्रपती संभाजी महाराज सेनेने निवेदनाद्वारे केली जिल्हा प्रशासनाकडे मागणी💥 

परभणी (दि.०६ जुलै) - जिल्हा पोलिस दलाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या पथकाने पुर्णा तालुक्यातील ताडकळससह गंगाखेड येथून काळ्या बाजारात जाणारा जवळपास ५०० क्विंटल तांदूळ पकडलेला असून जिल्ह्यातून अनेक वेळा शासकीय गोदामांसह गोदाम परिसरातून स्वस्त धान्य पुरवठा करणाऱ्या वाहनांतून शासकीय स्वस्त धान्य चोरीस गेल्याचे प्रकार सातत्याने घडत आलेले आहेत. १६ टायर गाडीने म्हणजेच मोठ्या ट्रकने जाणारा तांदूळ गंगाखेड व ताडकळस पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडलेला आहे.

पोलिस प्रशासनाने पकडलेला हा तांदूळ शासकीय स्वस्त धान्यातील असल्याचा संशय असून तहसील कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सदरील तांदूळ लॅबोरेटरीज पाठवण्यात येतो आणि त्यांच्या अहवालानुसार तो तांदूळ राशनचा आहे किंवा नाही याबाबत तहसील कार्यालयाकडून कळविण्यात येते परंतु इतरत्र लाबोरेटरीला पाठवल्यानंतर त्या लॅबोरेटरी बद्दल आम्हाला संशय असून केवळ गुडगाव येथील अहवालात कसल्याही प्रकारची अफरातफर होत नाही त्यामुळे सदरील तांदूळ गुडगाव दिल्ली येथील लॅबरोटरीस पाठवण्यात यावा जेणेकरून सत्य बाहेर येईल आणि प्रशासनास कारवाई करण्यास सोपे जाईल, त्यामुळे गुडगाव येथे प्रयोगशाळेसाठी सदरील तांदूळ पाठविण्यात यावा तसेच सदरील तांदळाचे पोते इन कॅमेरा खाली करावेत जेणेकरून तो तांदूळ राशनचा असल्याचे निदर्शनास येईल अन्यथा संभाजी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. सदरील निवेदनावर प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, शहराध्यक्ष अरुण पवार, सोनू पवार ,जयेश घोगरे, पवन कुरील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या