💥विद्यार्थ्यांना 'धोंडी' मागायला लावणार्‍या कारंजा तालुक्यातील 'त्या' शिक्षकाला प्रशासनाने बजावली कारणे दाखवा नोटीस....!


💥अंधश्रध्दा पसरवणार्‍या गुरुजीला कायद्याने धडा शिकवाच,जिल्ह्यातील शिक्षकांचीही मागणी💥

💥अंधश्रध्देच्या खाईत लोटणारा विद्यार्थ्याकडुन ऊपक्रम करवुन घेतल्यामुळे विविध स्तरातुन रोष💥

💥सदर शिक्षकावर अंनीस कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करण्याची होत आहे मागणी💥

(फुलचंद भगत)

वाशिम:-कारंजा तालुक्यातील धोञा जहागीर येथे शाळकरी मुलांकडुन तेथील शिक्षक बनारसे यांनी धोंडी मागुन घेतली आणी दमदार पाऊस पडु दे असे वरुणराजाला साकडे घातले.सदर ऊपक्रमाची एका वृत्तपञातुन दि.३ जुनला प्रसिध्दीही देण्यात आली आहे.सदर ऊपक्रमातुन अंधश्रध्देला खतपाणी मिळत असल्याने शिक्षकाच्या सेवाशर्ती नियमांचे भंग आहे.विद्यार्थ्यांना विज्ञानवाद शिकवायचे सोडुन अंधश्रध्दा जोपासणार्‍या असे कृत्य करवुन घेतल्यामुळे सर्व स्तरातुन रोष व्यक्त करण्यात येत असुन सदर शिक्षकाने कर्तव्यात नेमुन दिलेल्या कर्तव्याचा भंग केल्यामुळे त्वरीत निलंबित करावे अशा इतर शिक्षकामधूनही प्रतिक्रीया सोशल मिडीयावर ऊमटल्या आहेत.

सदर ऊपक्रमातुन मुलांना बालपणापासुनच अंधश्रध्देच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न असुन सबंधितावर अंधश्रध्दा निमुर्लन कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवावेत अशीही मागणी जोर धरत आहे.धोंडी प्रकरणाची वरिष्ठ प्रशासकिय स्तरातुन त्वरीत दखल घेवून शिक्षणाधिकारी यांच्या आदेशावरुन कारंजाचे गटशिक्षणाधिकारी यांनी सबंधित शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.याप्रकरणी पुढे शिक्षण विभाग काय कारवाई करते?की सबंधिताकडुन घेवुनदेवून प्रकरण सेटलमेंट होते याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.याप्रकरणी योग्य कायदेशीर कारवाई न झाल्यास अंनिसकडुन कायदेशीरपञे सदर शिक्षकासह सर्व वरिष्ठावरही कारवाईसाठी पाऊले ऊचलण्यात येणार असल्याचे कळले आहे.बःर्‍याच शिक्षक संघटना आणी इतर शिक्षकांनीही या धोंडी प्रकरणाचा निषेध केला असुन  दोषींवर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी केली आहे.कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी याप्रकरणी कोणती भुमिका घेतात याकडे शिक्षणविभाग आणी शिक्षणप्रेमीसह अंनिस आणी जिल्हावाशीयांचे लक्ष लागले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या