💥आपल्याला एवढं सुंदर जीवन दिलं आहे ते संपवायचं कश्याला ? हा प्रश्न पडतो...?


💥दोन शब्द आपल्या माणसासाठी - प्रा.सैनाजी माठे

धनगर टाकळी गावात मागच्या काही वर्षापासून नेहमी दुःखद घटना घडताना पाहत आहे, ह्या घटना पाहून मन व्यतिथ होत आहे आत्महत्या च्या घटना पाहत आहे, कुणी फाशी घेत, तर कुणी औषध पिऊन, कुणी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून आपलं आयुष्य संपवत आहेत,ह्या गोष्टी वाईट आहेत.

-आपल्याला एवढं सुंदर जीवन दिलं आहे ते संपवायचं कश्याला ? हा प्रश्न पडतो.

- गावात नदी आहे बऱ्याच घटना ह्या नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या घडत असतात. गावात नदी आहे खूप पाणी असतं लहान मुलासाठी धोका आहे हे सगळं माहिती असताना तरी देखील आपण काळजी करत नाहीत, आपण काळजी घेणं, आपल्या पाल्याची काळजी घेणं अपेक्षित आहे पण आपण ती गोष्ट सिरियस घेत नाहीत,म्हणून नेहमी अनुचित प्रकार आपल्या गावात घडत असतो.

-लाईट बाबतीत पण आपण काळजी घेत नाहीत लाईट आपल्यासाठी धोकादायक आहे, तरीही आपण लाईट बाबतीत रफली वागतोत, म्हणून दरवर्षी एक दोन मृत्यू हे लाईट मुळे होतात खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण काळजी का घेत नसतील.

-दारू पिऊन प्रवास करणे आणि अपघाताचा बळी होणे हे पण चुकीचे आहे, दारू पिण्यावर मर्यादा हव्यात, आपण आपलं कुटुंब सांभाळत असताना दारू, व्यसन ह्या गोष्टी दुय्यम असतात पण आपण त्यांना प्रथम मानतोत आणि वेळ निघून गेल्यावर पश्चताप करतो. आपण आपल्या कुटुंबासाठी खूप महत्वाचे आहोत हे आपल्याला शेवट पर्यंत समजत नाही.

-अश्या भरपूर गोष्टी आहेत 

आपण काहीच सिरीयस घेत नाहीत, जीवन हे खूप सुंदर आहे, आपल्याला मिळालेलं ते खूप मोठं वरदान आहे, आपण ते नशिबात एवढंच होतं म्हणून मोकळे होतं, खरं तर आपण काळजी घेणे, कुटुंबाचा विचार करणे, पाल्याची काळजी घेणे,थोडं फार बंधनात राहणे आज खूप महत्वाचे झाले आहे.

-आपण आहोत तर जग आहे, आपण राहिलो तर आपली परिस्थिती बदलू, आपण राहिलो तर शून्यातून विश्व निर्माण करू, आपण असल्यावर खूप पर्याय तयार होऊ शकतात पण आपणच जर स्वतः ला संपवल तर मग सगळं संपत.

- म्हणून जीवन संपवू नका जागा, आपण आहोत तर आपलं कुटुंब आहे.

-आपण आपलं आयुष्य संपवल्यावर सगळ्यात जास्त त्रास होतो तो म्हणजे आपल्या आई वडिलांना.

-स्वाभिमानी जीवन जगा, कुणाच काही मनावर घेऊ नका, शिका, संघटित व्हा, आपल्या मुलांना शिकवा, आपले आणि मुलांचे शिक्षण हेच तुमच्या आमच्या आयुष्याची कमाई आहे. शिक्षण गरिबी दूर करू शकतं.

-आत्महत्या करू नका, लाईट-पाणी सोबत जपून रहा, काळजी घ्या 🙏

-दारू पेक्षा बाकी गोष्टी महत्वाच्या आहेत, दारू सोडून बाकी पण खूप आयुष्य आहे, दारू मुळे वेळ वाया जातोच त्याच बरोबर जीवन पण कमी होतं आणि आकस्मित मृत्यू पण येऊ शकतो त्या मुळे दारू पासून दूर राहून आपण आपलं आयुष्य अधिक सुखकर करू शकतो.

-कधी कधी अति राग आणि घाईत घेतलेला निर्णय पण आपल्या सुंदर आयुष्याला संपवत असतं.

-आता शिक्षण हे खुप महत्वाचे झाले आहे, खूप सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, मोबाईल चा योग्य वापर करून आपण आपली पिढी जगाच्या स्पर्धेत पुढ ठेवू शकतो पण आपण त्या दिशेने प्रवास करणे  आवश्यक आहे.

-मागील काही दिवसात आपल्या खूप जवळची माणसे आपल्यातून निघून गेली, खूप वाईट वाटले, जिवा भावाची माणसं होती, खूप चांगली माणसं होती त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी तयार झाली आहे ते भरून निघणे शक्य नाही.

-आपण आपसातले लहान मोठे वाद मिटवून घेतले पाहिजेत. चांगल्या आणि वाईट गोष्टी कोणत्या यातील फरक समजून घेतला पाहिजे.

-प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चांगले वाईट अनुभव येत असतात, फक्त थोडा  वेळ जाऊ द्यावा लागत असतो तो पर्यंत संयम ठेवणे आवश्यक असतो.

-आपल्या प्रगतीला कोणता रस्ता फायद्याचा आहे आणि त्यासाठी कोण कोणत्या गोष्टी आपण करायला पाहिजे हे आपण समजून घेतले पाहिजे.

-परिवर्तनाच्या वाटेवर वर्तमानात आयुष्याची गाडी कार्यरत ठेवली पाहिजे . जीवनाला संपवायचं की हसत ठेवायचं याचा रिमोट स्वतः च्याच हातात असतो , फक्त बटणं कोणती दाबायची ते समजदारीने ठरवणं....!

-चांगल्या कामाच्या भावना मनामध्ये निर्माण होणे , हे हसत्या खेळत्या जिंदगीचं गमक आहे . पण भावना निर्माण करण्याआधी परोपकाराची जाणीव असावी लागते . स्वतः च्या हसत्या -  खेळत्या आयुष्याला ब्रेक लावणारे लोकही तुम्हांला भेटतील , मात्र आपण त्यांना इग्नोर करायचं . 

-परिस्थिती अभावी आपल्या जीवनात फाटलेल्या गोधडीचे भोकं आपल्यालाच माहीत असतात , आणि याच्यातून आपण कसे - बसे मार्ग काढून आयुष्यात हसतं - खेळतं वैभव निर्माण करत असतो , 

पण या संघर्षात काही जखमा खूप मोठया असतात टाक्या घालाव्या एवढ्या , पण लोकं Sorry बोलून पट्टी लावून जातात , त्याच्यामुळे लोकांच्या फंद्यात जायचं नाही...!

-सत्य - असत्य , धर्म - अधर्म , निती - अनीती यातली आयुष्याला चांगली पात्र ठरणारी बाजू पकडून आयुष्यात हसत्या खेळत्या वैभवाचा जन्म घालायचा.

आनंद घेताना दुसऱ्याच्या आनंदासाठी कधी काळी हारायचं सुद्धा असं जगत चालायचं . प्रभावामुळे जवळ येणाऱ्या व्यक्तींना मार्गदर्शन करत चालण्याची वृत्ती ठेवायची..

*स्वतःला इतकं उत्कृष्ट बनवायचं की कोणी आपली उपेक्षाच केली नाही पाहिजे.*

मान्य आहे की , जन्मापासून तर मृत्यु पर्यंत आनंद शोधताना " जीवाची " खूप ओढाताण करावी लागते , पण त्याच्या शिवाय पण मजा नाही या दोन्ही मधला जो काळ असतो त्या काळात चांगले कर्म करून आयुष्याला हासरं करायचं असतं , आणि जीवनासोबत खेळायचं असतं.

भूतकाळात जे घडलं असेल त्याच्यात रमून बसू नका व भविष्याची सोनेरी स्वप्ने पण कोरू नका , फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रित करा , आपण सध्या कसं रहस्यमय जगू याचाच विचार करा . हसतं - खेळतं आयुष्य जगण्याचं हेच गमक आहे.

निसर्गानं जेवढं दिलं त्यात समाधान मानून उगच अनेक अपेक्षांचे भार डोक्यावर चढवू नका , याच्यात प्राप्त असणारं सुख पण आपण गमावून बसतो . वर्तमानात जसं घडत आहे तसंच पुढं घडवत राहा , उगच भविष्याच्या योजना आखत बसलो तर खऱ्या जीवनाचं दर्शन कधीच घडणार नाही म्हणून आहे त्या गोष्टी टिकवून ठेवून हसत - खेळतं जगणं टिकवायला शिका.

वैयक्तिक पातळीवर , स्वतः ला जन्म देणारे आईवडील , तुम्ही स्वतः , एकंदरीतच आपला परिवार इथपर्यंतच विचार करायचा , उगच चार लोकं काय म्हणतील याच्याच विचाराने हसतं - खेळतं आयुष्य जगायचं राहून जातं शेवटी हे चार लोकं आपल्याला खांद्यावर घेतात आणि राम नाम सत्य म्हणतात काही खरं नाही यांचा विचार करून , म्हणून आशावादी दृष्टीकोण ठेवून आयुष्याला छान बनवण्याचा प्रयत्न करा . एकमेकांसोबत प्रेमानं राहून आयुष्याला जिंकून घ्या , नाहीतरी दोन दिवसाच्या आयुष्यात उद्या तुम्ही आणि मी कुठे असणार कुणालाच माहीत नाही....! बघा मग तुम्हीच , हसत खेळत जगायचं की ,जीवन संपवायचं.

 आपल्या माणसासाठी थोडं लिहण्याचा प्रयत्न केला...

                                आपलाच

                             प्रा.सैनाजी माठे (MTech, E&TC)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या