💥सेनगाव तालुक्यातील बन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण परिषद संपन्न....!


💥या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोपान प्रकाश वाघ यांची प्रमुख उपस्थिती💥 


शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

सेनगाव तालुक्यातील बन येथे - दि.27/07/2022 रोजी जि प उच्च प्राथमिक शाळा बन येथे कापडशिंगी केंद्रांतर्गत केंद्रीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोपान प्रकाश वाघ व प्रमुख पाहुणे म्हणून कापडशिंगी केंद्रप्रमुख ए.टी.राठोड यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक पी.व्ही. फुंदे यांनी केले. तसेच शिक्षणातील बदल याबाबत विविध विषय तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती बन च्या सर्व सदस्यांनी व सरपंच यांनी सहकार्य केले. तसेच कार्यक्रमास संपूर्ण कापडशिंगी केंद्रातील सर्वच शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या