💥परभणीत न्यायालयीन निर्णयाचे स्वागत : ओबीसी समाजबांधवांतर्फे जल्लोष....!


💥स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा💥

परभणी (दि.20 जुलै) :   सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवार दि.20 जुलै 2022 रोजी झालेल्या सुनावणीत भाटीया आयोगानुसार निवडणूका घ्यावयाचा आदेश दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर सकल ओबीसी समाजबांधवांनी आज बुधवार दि.२० जुलै २०२२ रोजी सायंकाळी परभणीत फटाक्यांची आतिषबाजी केली व एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला.

         जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीसमोर सकल ओबीसी समाजाच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी एकत्रित येवून महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्या पाठोपाठ बँड लावून जल्लोष साजरा केला. या वेळी ‘ओबीसी एकजूटीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. एकमेकांना पेढेही भरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते तथा माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार, भाजपाच्या उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत डहाळे, माजी नगरसेवक सचिन अंबिलवादे, डॉ. धर्मराज चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नाना राऊत, नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष संपत सवणे, कृष्णा कटारे, राजेश बालटकर, मोईन मौलवी, माणिक आव्हाड, गंगाप्रसाद आनेराव, लक्ष्मण बोबडे, भीमा कानडे, विष्णू बोरचाटे, राजेंद्र वडकर, फारुक ओवेसी, विशाल बुधवंत, छगन भंवर, बाबाराव आव्हाड, गोकुळ लोखंडे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

          यावेळी नेतेमंडळींनी दोन मागण्या या निमित्ताने पूर्ण होत आहे. परंतु, उर्वरीत मागण्यांसाठी ओबीसी समाजबांधवांचा संघर्ष सुरुच राहील, असे म्हटले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या