💥परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा...!


💥पाथरी,सोनपेठ,मानवत,गंगाखेड आणि परळी तालूक्यातील गोदाकाठावरील गावांना देण्यात आला इशारा💥

परभणी (दि.12 जुलै) : पाथरी तालूक्यातील गोदावरी नदीवरील मुदगल उच्च पातळी बंधारा 70 टक्के क्षमतेने भरला आहे. पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक पाहता बंधाऱ्याचे एक द्वार उघडून साधारणत: 8 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक पाहून विसर्गात वाढ देखील करण्यात येणार आहे.  

याकरीता पाथरी, सोनपेठ, मानवत, गंगाखेड आणि परळी तालूक्यातील गोदावरी नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा लघू पाटबंधारे विभाग, परभणी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या