💥अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज विरोधी विरोधी पक्षनेते अजित पवार....!


💥राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे हवालदिल झाले असतांना मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री मात्र दिल्ली दौरे करत आहेत💥

 शिवशंकर निरगुडे - 

राज्यचे विरोधी पक्षनेते अजित पवार व धनंजय मुंडे आज हें आज हिंगोली व नांदेड जिल्हाच्या दौऱ्यावर आले आहेत  राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे हवालदिल झाले असतांना मुख्यमंत्री अन उपमुख्यमंत्री मात्र दिल्ली दौरे करत आहेत त्यांनी दिल्ली व ईतर दौरे थांबून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करून अडचणीतून बाहेर काढावे असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दि 30/07/2021 रोजी दुपारी डोंगरकडा  ता कळमनुरी येथे केले आहे.


* काय म्हणाले विरोधी पक्षनेते अजित पवार :-

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा व कुरुंदा येथील पूर परिस्थितीचा आढावा घेतला व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिल्ली दौऱ्यातच व्यस्त आहे .शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे मोठे संकट ओढवले असून त्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नकडे लक्ष न देता त्याचे दिल्ली दौरेच चालु आहेत राज्यातील शेतकऱ्यांना अडचणीतुन बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी पालक मंत्र्यांना नियुक्त करून नुकसानीची माहिती घ्यावी राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन मोठा कालावधी लोटला तरी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोठे आहेत हें कळायला मार्ग नाही सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढले पाहिजे असे त्यांनी या वेळी सांगितले अनेक शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करून त्याना तातडीने मदत करावी अशी मागणी अजित पवार यांनी हिंगोली बोलताना केली आहे 

*हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा केली पाहणी :-

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली या वेळी माजी मंत्री धनंजय मुंढे माजी मंत्री जय प्रकाश दांडेगावकर आमदार राजु नवघरे राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण यांचा सह राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थितीत होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या