💥हिंगोलीत दारू बंद व्हावी यासाठी गणपतराव चढले थेट मोबाईल टॉवरवर फाशी घेण्याचा प्रयत्न....!


💥कोंडशी बुद्रुक गावात एका व्यक्तीने थेट टॉवरवर फाशी घेण्याचा प्रयत्न केला💥

* शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

दारूबंदी आणि जुगार अड्डे बंद करण्यासाठी अनेक वेळा आंदोलन केले जातात पण हिंगोलीतील कोंडशी बुद्रुक गावात एका व्यक्तीने थेट टॉवरवर फाशी घेण्याचा प्रयत्न केला औंढा नागनाथ तालुक्यातील कोंडशी बुद्रुक येथे एका नागरिकांनी गावातील दारूबंदी व जुगार अड्डे बंद करण्यासाठी मोबाईल टॉवरवर फाशी घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सदर नागरिकास परावृत्त करून खाली उतरवले.

जवळाबाजार पासून ३ किलोमीटर अंतरावर असोला पाटी ते गोळेगाव रस्त्यावर सदर गाव आहे. गावातील लोकसंख्या अवघी ८०० असली तरी गावातील बहुतांश युवावर्ग दारू व जुगाराच्या नादी लागल्याचे दिसून येत आहे. स्वतःचा मुलगा मागील काही दिवसापासून दारू पिऊन त्रास देत असल्याच्या कारणावरून गणेश हरिभाऊ गायकवाड ( वय ४२ ) यांनी बुधवारी सकाळी हातात दोर घेऊन ग्रामपंचायतच्या मोबाईल टॉवरवर फाशी घेण्याच्या उद्देशाने चढले. गावात संपूर्ण दारूबंदी करण्याचे आश्वासन पोलीस देत नाहीत तोवर खाली न उतरण्याचा त्यांचा निश्चय होता. गावातील कोणीही टॉवरवर चढण्याचा प्रयत्न केल्यास फाशी घेण्याची धमकी सदर नागरिक देत होता.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जवळाबाजार पोलीस चौकीचे उपनिरीक्षक सतीश तावडे,जमादार भुजंग कोकरे व पोलीस नाईक कबीर पाईकराव हे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दारूबंदीचे ठोस आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्ते गणेश गायकवाड हे मोबाईल टावर वरून खाली उतरले. यानंतर गावातील मारुती मंदिरासमोर पोलिसांनी जनतेची मीटिंग बोलावून दारूच्या दुष्परिणामाविषयी समुपदेशन केले.

जनतेच्या मागणीवरून दारू दुकानाची पाहणी केली मात्र पोलिसांना मुद्देमाल आढळून आला नाही. यापुढे अवैध दारू विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी गावाला नियमीत भेट देण्यात येईल असे उपनिरीक्षक तावडे यांनी सांगितले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या