💥या संस्थेतील प्रशिक्षण वर्गाना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ, मुंबईची शासन मान्यता आहे.💥
परभणी (दि.20 जुलै) : दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षण महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गाना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ, मुंबईची शासन मान्यता आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील FICCI AWARD 1999 हा प्राप्त झालेला आहे. सन 2022-23 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे.
या प्रशिक्षणासाठी सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथएम.एस. ऑफिस (संगणककोर्स) किमान इ. ८ वी पास ब) मोटार ॲन्ड आमेचर रिवायडींग, सबमर्सिबल पंप सिंगलफेज, (इलेक्ट्रीक कोर्स ) किमान इ. ९ वी पास असणे आवश्यक आहे. तसेच याकरीता वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष असून, प्रशिक्षण कालावधी हा एक वर्ष राहणार आहे. तसेच याप्रशिक्षणासाठी केवळ दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जाणार आहे. प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत संगणक कार्यशाळा, प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. तसेच समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगार व्यवसायासाठी बीज भांडवल योजनेचा लाभ घेता येणार आह.
प्रवेशअर्ज व माहिती पत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, ह, टाकळीरोड, म्हेत्रेमळा, गोदड मळ्या जवळ, मिरज ता. मिरज जि. सांगली पिन कोड:- 416 410 नंबर :0233-2222908 मोबाईल 9922577561/ 9975375557 या पत्यावर पोस्टाव्दारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणती ही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्ण पणे भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांग असल्या बाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे 31 जुलै 2022 पुर्वी पोहचतील अशा बेताने पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समितीव्दारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल. गरजू दिव्यांगानी या संधीचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधावा. ग्रामीण व शहरी भागातील लोकांना आवाहन करण्यात येते की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणांस ज्ञात असलेल्या गरजू अपंग बांधवाना या शासकीय योजनेची माहिती करून द्यावी. असे आवाहन अधिक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह मिरज यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.....
0 टिप्पण्या