💥परभणी जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक शाळा व महाविद्यालयांनी अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत...!


💥जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपले प्रस्ताव दि.31 जुलै 2022 पर्यंत सादर करावेत💥

परभणी (दि.27 जुलै) : राज्यातील नोंदणीकृत शाळांच्या आधुनिकीकरणासाठी धार्मिक अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळेत पायाभुत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेस मंत्रीमंडळाने मान्यता दिली असून मदरशांनी व शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपले प्रस्ताव दि.31 जुलै 2022 पर्यंत सादर करावेत.

            सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी शासन निर्णयातील अटी व शर्तीनूसार ही योजना राबविण्यात येणार आहे. तरी पात्र संस्थांनी आपला प्रस्ताव मुदतीत सादर करावा मुदतीनंतर आलेल्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही. असे जिल्हाधिकारी, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या