💥लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना दिर्घायुष्य लाभो यासाठी टोकवाडी येथे रत्नेश्वरास रुद्राभिषेक व इतर कार्यक्रम संपन्न....!


💥त्यानंतर श्री रत्नेश्वर मंदिर परिसरात विविध प्रजातीच्या वृक्षांचे वृक्षारोपन करण्यात आले💥

परळी वैजनाथ : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्राच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवस निमित्ताने  टोकवाडी भाजपच्या वतीने टोकवाडी येथील श्री रत्नेश्वर मंदिरात अभिषेक करण्यात आला तसेच वृक्षारोपण व विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. पंकजाताई मुंडे यांच्याकडेच विकासाची दृष्टी असल्याची भावना याप्रसंगी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.


      लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचा आज वाढदिवस होता. त्या निमित्ताने येथे सर्वप्रथम सकाळी प्रभू रत्नेश्वरास रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर श्री रत्नेश्वर मंदिर परिसरात विविध प्रजातीच्या वृक्षांचे वृक्षारोपन करण्यात आले. तसेच टोकवाडी ग्रामस्थांच्या वतीने अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.

      याप्रसंगी उपस्थित  कार्यकर्त्यांनी पंकजाताई मुंडे यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंकजाताई मुंडे यांनी आवाहन केल्याप्रमाणे सामाजिक कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी टोकवाडी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुग्रीव मुंडे भाजपाचे परळी तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे  टी डी मुंडे मारुती मुंडे गुरुजी डॉक्टर भरत मुंडे जगन्नाथ मुंडे तुकाराम मुंढे दीनानाथ आघाव प्रकाश काळे उत्तम काळे संजय श्रीराम मुंडे सोपान काका मुंडे संतराम काळें नागनाथ जीवराज मुंडे अनंत मुंडे तुकाराम अंगद मुंडे बाबुराव मुंडे अभिमान रोडे प्रभू गिरी लक्ष्मण एकनाथ मुंडे नागनाथ ज्ञानोबा मुंडे तुकाराम भक्ताराम मुंडे रोहित मुंडे हनुमंतराव मुंडे महादेव मुंडे मीनानाथ मुंडे हनुमान मधुकर मुंडे संतोष मुंडे आकाश जाधव सोमनाथ बाडगे धोंडीराम रोडे राजेश मुंडे प्रल्हाद जगताप सर वसंत मुंडे एकनाथ मुंडे शिवाजी शंकर मुंडे सुखदेव मुंडे विजय मुंडे, राम साबळे नामदेव भोसले नामदेव मुंडे भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

💥पंकजाताई मुंडे या विकासाची दृष्टी असलेल्या नेत्या आहेत हे त्यांनी यापूर्वीच सिद्ध केले :-

भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे या विकासाची दृष्टी असलेल्या नेत्या आहेत हे त्यांनी यापूर्वीच सिद्ध केले आहे. महाराष्ट्रामध्ये ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी केलेले शेतकऱ्यांची कामे व ग्राम विकासाची कामे आजही शेतकऱी व जनतेच्या हिताची असल्याचे दिसून येत आहे. परळी मतदारसंघात सत्ता असो किंवा नसो पंकजाताई मुंडे या नेहमीच मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी कार्यरत असतात अशी ही भावना या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेले दिसून आली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या