💥हिंगोली व नांदेड जिल्ह्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा दौरा....!


💥अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा घेणार आढावा💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते आजित पवार उद्या दि 30/07/2022 रोजी हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करणासाठी हिंगोली व नांदेड येथे  येणार आहेत.

* कसे असणार त्याचे येण्याचे नियोजन :-

यवतमाळ वरून सकाळी 6.30 मोटारीने 8.00 वाजता दत्तामांजरी तालुका माहूर जि .नांदेड येथे आगमन होणार आहे नांदेड व जिल्ह्यातील आढावा पूर परिस्थितीचा आढावा घेऊन नंतर  नंतर मोटारीने महागाव उमरखेड मार्गे 10.15 वाजता  हदगाव तालुक्यातील  पूर परिस्थितीची पाहणी नंतर वारंगा फाटा मार्गे  11.30 कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील पूर परिस्थिती आढावा घेणार नंतर दुपारी 12.45 ला हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा गावातील पूर परिस्थितीचा आढावा घेणार नंतर 1.45 राखीव जयप्रकाश दांडेगावकर व आमदार चंद्रकांत उर्फ राजू  नवघरे व नंतर 3.15 ला हिंगोली जिल्ह्यातील पूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात चर्चा होणार व त्या नंतर मयूर मंगल कार्यालय आगमन होणार कार्यक्रत्याच्या गाठी भेटी होणार व नंतर पत्रकार परिषद होणार असा दौरा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा राहणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या