💥अन्यथा पुलावर रस्ता रोको आंदोलनचा प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा💥
परभणी - तालुक्यातील बोबडे टाकळी ते जोडपरळी या रस्त्यावरील भटाच्या नाल्यावर असलेला पुल हा कमी उंचीचा असल्याने पावसाचे पाणी त्या पुलावरून जात असल्या कारणाने पावसाळयामध्ये हा रस्ता दोन - दोन दिवस वाहतुकीसाठी बंद असतो त्यामुळे जोडपरळी या गावाचा जिल्हयाशी व तालुक्याशी संपर्क तुटतो. मागील दहा वर्षापासुन जोडपरळी येथील ग्रामस्थांनी वारंवार विनंती करूनही प्रधान मंत्री ग्राम सडक योजना विभागाने संबंधीत काम हाती घेटले नाही.
जोड़परळी या गावाला इतर गावाशी व जिल्हयाला जोडणारा बोबडे टाकळी ते जोडपरळी हा एकमेव रस्ता आहे या रस्त्यावरील संबंधीत पुलाची उंची कमी असल्याने थोडा जरी पाऊस पडला तरी पुलावरून पाणी वाहू लागते अशा परिरिस्थतीमध्ये गावातील शाळकरी विद्याथ्यांना दोन - दोन दिवस शाळेत जाता येत नाही शिवाय गावामध्ये एखादा आजारी रुग्ण असल्यास त्या रुग्णास वैद्यकीय सेवा देण्यासाठी जिल्हयाच्या ठिकाणी आणता येत नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे.
या बाबत प्रहार जनशक्ती पक्ष परभणीकडे जोडपरळी गावातील नागरीकांनी तक्रार देवून संबंधीत पुलाचे काम प्रशासनाकडे पाठपुरावा करून तात्काळ मागी लावणे बाबत विनंती केली आहे त्या अनुषंगाने आज प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्ट मंडळ व गावातील नागरिकांसह कार्यकारी अभियंता, प्रधान मंत्री ग्राम सडक योजना व महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. मागील १० वर्षापासून जोडपरळी गावातील नागरीकांची या पुलाची असलेली मागणी तात्काळ मार्गी लाऊन संबंधीत पुल निर्मितीसाठी आपल्या कार्यालयाच्या वतीने तात्काळ पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावुन मागील अनेक वर्षांपासून मागणी होत असलेला व पासाळ्यात यातना सहन करणाऱ्या जोडपरळी गावातील नागरीकांना न्याय द्यावा याबाबत आपल्या कार्यालयाने तात्काळ कार्यवाही न केल्यास दि .२५ जुलै २०२२ रोजी संबंधीत पुलावर प्रहार जनशक्ती पक्ष परभणी व जोडपरळीतील नागरीकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व या वेळी उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत आपले कार्यालय जबाबदार असेल याची नोंद घ्यावी असा ही इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख ज्ञानोबा काळे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, महिला आघाडी शहर प्रमुख आरतीताई जुमडे, शहर चिटणीस वैभव संघई, बोबडे टाकळी सर्कल प्रमुख, झरी सर्कल प्रमुख श्याम भोंग, अनिल पडोळे, सय्यद समीर इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत....
0 टिप्पण्या