💥तालुक्यातील डोनवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले💥
जिंतूर प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या नेत्या तथा महाराष्ट्राच्या माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुरुवारी जय भगवान महासंघाच्या वतीने जिंतूर तालुक्यातील डोनवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
जय भगवान महासंघाच्या वतीने तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येत असतात त्याचाच एक भाग म्हणून आज, पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर हार, तुरे अशाप्रकारचा खर्च टाळून शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जय भगवान महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष किशन घुगे, युवा तालुकाध्यक्ष सोपान पालवे, मुख्याध्यापक श्रावणे, योगीराज वडगावकर, केशव आघाव,दादाराव पालवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.....
0 टिप्पण्या